वादळी पावसाचा अंदाज कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला बुधवारी (ता. ९) सुरवात झाली आहे. यातच राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. आज (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारपासून (ता. १२) विदर्भात हवामान कोरडे होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. उर्वरित भागात ढगाळ हवामानासह तापमानाही वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांशी ठिकाणी तापमान ३० ते ३४ अशांच्या दरम्यान आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सूरू झाला असून, राज्यात आणखी काही दिवस वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.२ (०.५), जळगाव ३३.६ (-१.४), कोल्हापूर ३०.३ (-०.७), महाबळेश्‍वर २५ (-०.१), मालेगाव ३२ (-१.३), नाशिक ३१.६ (-०.७), सातारा ३०.४ (-०.१), सोलापूर ३२.५ (-०.५), अलिबाग ३१.८ (-०.२), डहाणू ३३.३ (१.०), सांताक्रूझ ३४.० (१.३), रत्नागिरी ३३.८ (२.६), औरंगाबाद ३१.८ (-०.३), परभणी ३२.७ (-०.३), नांदेड ३३.० (-०.५), अकोला ३३.३ (-०.६), अमरावती ३३.२ (०.०), बुलडाणा ३०.० (-१.०), चंद्रपूर ३२.२ (-१.०), गोंदिया ३३ (०.०), नागपूर ३२.८ (-०.३), वर्धा ३२.५ (-१.०), यवतमाळ ३१.५(-१.०).  

बुधवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :  कोकण : अलिबाग ४५, कर्जत ३८, माथेरान ५९, मुरूड ४२, सुधागडपाली ३०, चिपळूण ३०, कुडाळ ६२, मुरबाड ३५, ठाणे ४०. मध्य महाराष्ट्र : चंदगड २९, गडहिंग्लज ३२, राधानगरी २७, खेड २७, कराड २७, सांगोला २०. मराठवाडा : अंबड १८, जाफराबाद १८, जालना २५. विदर्भ : साकोली २०, देऊळगाव राजा २१, कोरपणा २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com