agriculture news in marathi, weather predition, pune, maharashtra | Agrowon

कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे   : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचे उद्यापर्यंत (ता. २५) ‘चक्री वादळात’ रूपांतर होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे येऊन, पुन्हा खोल समुद्राकडे जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. आज (ता. २४) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा तर उर्वरितर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

पुणे   : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचे उद्यापर्यंत (ता. २५) ‘चक्री वादळात’ रूपांतर होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे येऊन, पुन्हा खोल समुद्राकडे जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. आज (ता. २४) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा तर उर्वरितर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आज (ता. २४) आणखी वाढणार आहे. किनाऱ्याकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे उद्या (ता. २५) चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. चक्रीवादळ तयार होताच ते पश्‍चिमेकडे खोल समुद्रात जाण्याची शक्यता आहे.   

दरम्यान कोकण, गोवा, कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार आहे. तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्रामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

पावसाळी हवामानामुळे आकाशात ढग जमा होत आहेत. अधूनमधून पडणाऱ्या उन्हामुळे चटकाही जाणवत असल्याने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी खालावलेले तापमान पुन्हा थोडेसे वाढल्याचे दिसून आले आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील नांदेड येथे सर्वाधिक ३३ अंश सेल्सिअस तापामनाची नोंद झाली. राज्यातील

विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.७ (-२.०), जळगाव २८.०(-६.८), कोल्हापूर २७.८(-३.६), महाबळेश्‍वर २२.७ (-३.२), मालेगाव २८.५ (-४.९), नाशिक २८.६ (-३.७), सांगली २८.८ (-४.५), सातारा २८.१ (-२.६), सोलापूर ३१ (-१.७),  रत्नागिरी ३१.५ (-०.९), औरंगाबाद २८.२ (-३.७), परभणी ३१.४ (-१.१), नांदेड ३३ (०.२), अकोला २७.५ (-६.०), अमरावती २९ (-४.६), बुलडाणा २४ (-६.४), चंद्रपूर ३२.६ (-०.१), गोंदिया ३०.४ (-१.९), नागपूर ३०.७ (-२.०), वर्धा ३१ (-१.६), यवतमाळ ३० (-१.७).


इतर अॅग्रो विशेष
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...