Agriculture news in Marathi The weather in the state is likely to remain dry | Agrowon

राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. आजपासून (ता. १९) राज्यात पाऊस उघडिप देणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. आजपासून (ता. १९) राज्यात पाऊस उघडिप देणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश आणि परिसराकडे सरकले आहे. यातच बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पश्चिमी चक्रावात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वारे एकत्र आल्याने उत्तर भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे आणि कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पोषक हवामानामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. तुरळक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने कपाशीसह खरिपाच्या काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हा पाऊस उघडिप देणार असून, आजपासून राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.६ (१९.१), नगर - (२०.१), जळगाव २६.० (२३.२), कोल्हापूर ३२.६ (२१.६), महाबळेश्वर २५.२ (१६.२), मालेगाव ३२.० (२२.०), नाशिक ३१.७ (२०.६), सांगली ३३.६ (२१.२), सातारा ३१.९ (१९.४), सोलापूर ३३.८ (२०.०), सांताक्रूझ ३३.८ (२५.८), अलिबाग - (२३.७), डहाणू ३२.७ (२५.५), रत्नागिरी ३२.८ (२३.६), औरंगाबाद २७.९ (२१.२), बीड ३०.८ (१९.०), नांदेड - (२२.२), उस्मानाबाद - (२१.०), परभणी २८.० (२२.६), अकोला ३०.२ (२३.५), अमरावती २६.० (२१.१), ब्रह्मपुरी ३३.५ (२१.२), बुलडाणा २५.६ (२१.३), चंद्रपूर २९.८ (२४.२), गडचिरोली ३०.० (२४.२), गोंदिया ३१.० (२३.२), नागपूर ३०.८ (२३.५), वर्धा २९.० (२३.९), वाशीम - (२०.०), यवतमाळ २७.५ (२२.५).


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...