agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Page 2 ||| Agrowon

उत्तर महाराष्ट्रात आजपासून धुके
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

पुणे : जमिनीत पुरेसा ओलावा असून दिवसभर प्रखर सूर्यप्रकाश पडत आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) आणि उद्या (ता. 13) उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी धुके पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भात कोरडे हवामान असल्याने थंडी वाढू लागली आहे. सोमवारी (ता.11) सकाळी आठ वाजेपर्यत गोंदिया येथे 10.4 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : जमिनीत पुरेसा ओलावा असून दिवसभर प्रखर सूर्यप्रकाश पडत आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) आणि उद्या (ता. 13) उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी धुके पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भात कोरडे हवामान असल्याने थंडी वाढू लागली आहे. सोमवारी (ता.11) सकाळी आठ वाजेपर्यत गोंदिया येथे 10.4 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. तसेच उत्तर भारतातील जम्मू आणि काश्‍मीर, हरियाना या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थितीची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी, राज्यातील कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेली थंडी हळूहळू परतू लागली आहे. सोमवारी (ता.11) विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशाने घट झाली असल्याचे चित्र होते.

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरातही आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

सध्या दक्षिणेकडून वारे वाहत आहे. कोकणातील रत्नागिरीतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशाने वाढ झाली असून वीस अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. अलिबाग येथे 21.4 किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशाने वाढ होऊन 15.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली. नगरमध्ये 13.5 अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान होते. सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने घट झाली आहे. मराठवाड्यातील बीडमध्ये 13.8 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान होते.

सोमवारी (ता.11) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रुझ) 21.2 (2), अलिबाग 21.4 (3), रत्नागिरी 20.0 (6), डहाणू 21.4 (3), भिरा 20.0 (2), नगर 13.5 (1), पुणे 15.1 (4), जळगाव 15.0 (3), कोल्हापूर 18.3 (3), महाबळेश्वर 14.6 (1), मालेगाव 16.0 (5), नाशिक 14.0 (3), सांगली 16.4 (2), सातारा 15.0 (1), सोलापूर 13.4(-2), औरंगाबाद 14.2 (3), बीड 13.8 (1),परभणी 15.1 (4), नांदेड 16.0 (3), अकोला 13.0 (-1), अमरावती 12.2(-3), बुलढाणा 14.6, चंद्रपूर 13.8, गोंदिया 10.4(-3), नागपूर 10.7 (-2), वर्धा 11.5 (-3), यवतमाळ 13.0 (-2)

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...