agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

थंडीच्या लाटेने विदर्भ गारठला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडीची लाट आली असून, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले आहे. बुधवारी (ता. 27) सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूर येथे 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडीची लाट आली असून, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले आहे. बुधवारी (ता. 27) सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूर येथे 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच घट झाली. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकणातील किमान तापमानात चढउतार सुरू आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात येत्या रविवारपर्यंत (ता. 31) पुणे परिसरात आकाश मुख्यत निरभ्र राहील.

सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थंडी हळूहळू वाढू लागली आहे. विदर्भातील नागपूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी घटले. गोंदिया, वर्धा येथील किमान तापमानही सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी घटले. उर्वरित भागातही किमान तापमानात एक ते तीन अंशांनी घटले असून विदर्भात थंडीने चांगलीच हुडहुडी भरविली आहे.

कोकणातील मुंबई, डहाणू, भिरा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घटले आहे. अलिबाग, रत्नागिरी येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, महाबळेश्वर, नगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घटले. पुणे, कोल्हापूर, मालेगाव, सांगली येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढले. मराठवाड्यातील औंरगाबाद, परभणी, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते चार अंशांनी घटले असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बुधवारी (ता. 27) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) ः

मुंबई (सांताक्रूझ) 16.6 (-1), अलिबाग 18.4(1), रत्नागिरी 20.3 (1), डहाणू 16.8 (-1), भिरा 15.0 (-2), पुणे 10.8, जळगाव 9.0 (-2), कोल्हापूर 16.1 (1), महाबळेश्वर 12.0 (-1), मालेगाव 10.5, नाशिक 8.2 (-1), सांगली 14.1 (1), सातारा 12.3 (-1), सोलापूर 15.0, औरंगाबाद 10.1 (-1), ,परभणी 9.5 (-4), नांदेड 10.0 (-2), उस्मानाबाद 8.6, अकोला 9.4 (-4), अमरावती 11.2(-3), बुलडाणा 12.0(-2), चंद्रपूर 10.8 (-3), गोंदिया 8.1 (-4), नागपूर 7.8 (-5), वर्धा 9.1 (-4), यवतमाळ 12.0 (-2).


इतर अॅग्रो विशेष
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...