agriculture news in marathi, weather, Vidharbha, Central Maharashtra has heat wave | Agrowon

उन्हाचा चटका कायम राहणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे देशातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, शुक्रवारपासून (ता. २५) कोकणात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे देशातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, शुक्रवारपासून (ता. २५) कोकणात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, जळगाव येथे उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात पारा ४५ अंशांच्या पुढे सरकला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव येथे सरासरी तापमानात ५ अंशांची वाढ झाल्याने लाटेची स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारपर्यंत (ता. २७) अनेक ठिकाणी तापमान ४२ ते ४५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. यामुळे मंगळवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलके ढग गोळा झाले होते. शुक्रवारपासून कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.७, नगर ४३.८, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३४.९, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ४४.८, नाशिक ३७.८, सांगली ३६.४, सातारा ३८.५, सोलापूर ४१.८, मुंबई ३४.७, अलिबाग ३६.७, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३५.४, आैरंगाबाद ४२.१, परभणी ४४.८, नांदेड ४४.०, अकोला ४५.६, अमरावती ४५.२, बुलडाणा ४१.७, ब्रह्मपुरी ४४.६, चंद्रपूर ४५.०, गोंदिया ४१.८, नागपूर ४५.२, वर्धा ४५.८, यवतमाळ ४५.५. 
 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...