Agriculture news in marathi the weather will remains warm and dry | Agrowon

हवामान उष्ण, कोरडे राहणार...

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 12 एप्रिल 2020

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर एक समान १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे या आठवड्यात फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. दिनांक १३ एप्रिल रोजी पूर्व किनारपट्टीवर हवेचा दाब कमी होऊन १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र दिनांक १४ एप्रिल रोजी सर्व उत्तर भारतातील हवेचे दाब कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून व नैऋत्येकडून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील. ही बाब मान्सूनचा रस्ता तयार करणारी असून, या वर्षी हा रोडमॅप लवकर तयार होत आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होणे तसेच चांगला मान्सून होण्यास हे चिन्ह दिशादर्शक आहे.
 

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर एक समान १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे या आठवड्यात फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. दिनांक १३ एप्रिल रोजी पूर्व किनारपट्टीवर हवेचा दाब कमी होऊन १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र दिनांक १४ एप्रिल रोजी सर्व उत्तर भारतातील हवेचे दाब कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून व नैऋत्येकडून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील. ही बाब मान्सूनचा रस्ता तयार करणारी असून, या वर्षी हा रोडमॅप लवकर तयार होत आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होणे तसेच चांगला मान्सून होण्यास हे चिन्ह दिशादर्शक आहे.

महाराष्ट्रातील नगर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत या आठवड्यात पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही बाब तापमान वाढून हवेचा दाब कमी करण्यास व वारे उत्तर दिशेने वाहण्यास अनुकूल ठरेल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. त्यामुळे दिशा निश्‍चिती लवकर होणे ही बाबही समाधानकारक मान्सून होण्यास अनुकूल ठरेल. या आठवड्यात कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे.

कोकण
कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्हे असतील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १२ एप्रिल रोजी १२ मि.मी. व दिनांक १४ एप्रिल रोजी ४ मी.मी. पावसाची शक्‍यता राहील. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून तर रत्नागिरी जिल्ह्यात ती नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ मि.मी. इतका कमी राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५० ते ५७ टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ती ६३ ते ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २५ टक्के राहील, त्यामुळे हवामान कोरडे व उष्ण राहील.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. या आठवड्यात या विभागात आकाश निरभ्र राहील व पावसाची शक्‍यता नाही.

मराठवाडा
बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. उर्वरीत लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत या आठवड्यात कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत या आठवड्यातील काही दिवशी हवामान अंशतः ढगाळ राहील. मात्र उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. यापुढे तापमानातील वाढ कायम राहील.

पश्‍चिम विदर्भ
वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. तसेच वाशिम जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता कमी आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात २३ टक्के व उर्वरित जिल्ह्यांत १९ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भात सुरुवातीस यवतमाळ जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. मात्र त्यात वाढ होऊन नंतर ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तशीच स्थिती नागपूर जिल्ह्यात राहील. मात्र वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. मात्र, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५० टक्के राहील.

पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील व याच आठवड्यात त्यात वाढ होऊन ते चंद्रपूर जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यात ते ४२ अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
नगर जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. मात्र दोन दिवसांत त्यात वाढ होऊन ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ते २५ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६२ टक्के तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती ४३ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २१ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ किलोमीटर राहील, वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला

  • आठवड्यात कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ होईल.त्यामुळे पिके, जनावरांची पाण्याची गरज वाढेल. पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे.
  • जनावरांना सावलीत बांधावे. पुरेसा हिरवा चारा, पशुखाद्य द्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...