राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धेला विणकरांचा प्रतिसाद

Weaver's response to the state-level handloom textile competition
Weaver's response to the state-level handloom textile competition

सोलापूर : श्रीनिवास ईरण्णा मोने यांच्या रेशीम साडीस आणि श्रीनिवास बालण्णा इगे यांच्या गणपती वॉल पीसला हातमाग कापड स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विभागून बक्षीस मिळाले. त्यांचा प्रत्येकी साडेबारा हजार रुपयांच्या रोख बक्षिसाने गौरव करण्यात आला.

सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाने हे राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन केले होते. वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त किरण सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक एस. पी. काकडे, सहायक आयुक्त किशन पवार, टेक्स्टाईल डिझाइनर जयंत मंगलपल्ली, शास्त्रीय तंत्रनिकेतनच्या वस्त्रोद्योग विभागाचे प्रभारी प्रमुख एन. वाय. नादरगी, महाटेक्सचे संचालक गणपत कुरपाटी यावेळी उपस्थित होते. 

हातमाग व्यवसायातील विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेत पारंपरिक आणि अपरंपरागत हातमाग वाणांचा समावेश होता. स्पर्धेत ४१ विणकर स्पर्धकांनी आपल्या १३२ वाणांचा सहभाग नोंदवला होता. यावेळी श्री. सोनवणे, श्री. भोळे यांनी विणकरांच्या कौशल्याचे कौतुक केले. अशा उपक्रमाची गरज असल्याचे आणि त्याची उपयुक्तता असल्याचे सांगितले. 

हातमाग कापड स्पर्धेतील बक्षीस विजेते या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विभागून अशोक टिपरे, कृष्णहरि पोराम, गोवर्धन दुधगुंडी, जयश्री मोने (प्रत्येकी पाच हजार रुपये रोख) व तृतीय क्रमांक विभागून गणपती सणगर, नागनाथ गेंट्याल, ईरेशम्मा रोडा, अंबादास भारत, काशीनाथ सातलगाव (प्रत्येकी तीन हजार रुपये रोख) देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com