प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करा ः जिल्हाधिकारी मांढरे

मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची खडखडाट थांबली होती. परिणामी, यावर अवलंबून असणार मोठा मजूर वर्ग रोजंदारीपासून वंचित होता. शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. संबंधितांनी नोंद घेवून यंत्रमाग सुरू करा’’, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
 Weaving outside the restricted area Start: Collector Mandhare

मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मांढरे बोलत होते. यावेळी इनर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अप्पर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, धान्य वितरण अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते. 

मांढरे म्हणाले, ‘‘शासनाने यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, यंत्रमागचे चालक व मालकांनी आपल्या मजुरांची विशेष काळजी घ्यावी. मजुरांमध्ये सुरक्षित अंतर व आवश्यक खबरदारी बाळगावी. मजुरांनी त्यांना आजाराची थोडी जरी लक्षणे जाणवत असली तरी तात्काळ स्वत:ला अलगीकरण करून आवश्यक उपचार घ्यावेत. मजुरांनी विशेष काळजी घेवून आपला रोजगार नियमित सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील रहावे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com