लग्नसोहळ्याआधी वधू - वरांनी रोपवाटिकेत केले बीजरोपण

लग्नसोहळ्याआधी वधू - वरांनी रोपवाटिकेत केले बीजरोपण
लग्नसोहळ्याआधी वधू - वरांनी रोपवाटिकेत केले बीजरोपण

नाशिक : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी तरुण मित्रमंडळातील सदस्यांच्या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी नवरदेव लग्न बोहल्यावर चढण्याआधी पहिल्यांदा बीजरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर लग्नसोहळा झाला. लग्नातील पारपंरिक पद्धतीला फाटा देऊन पर्यावरणसंवर्धनासाठी हे बीजारोपण करण्यात आले.

मित्रमंडळाचे सदस्य तुषार भोरकडे यांचे तालुक्यातील ममदापूर येथील राधा केरे यांचीशी झाला. लग्नसोहळ्यापूर्वी नवरा- नवरीने परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील रोपवाटिकेत बीजरोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हिरडा, बेहडा, पळस यांसह इतर देशी वृक्ष बियाण्यांचे रोपण केले. त्यात मंडळाच्या सदस्यांसह वऱ्हाडींनीसुद्धा भाग घेतला.

वधू-वरांना मंडळाने लग्नात आहेर म्हणून डबल सिटर सायकल भेट दिली. पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे वचन नवदांम्पत्याकडून घेतले. या वेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com