महाविकास आघाडीच्या ‘बंद’ला वऱ्हाडात प्रतिसाद

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, न्याय मिळावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीने सोमवारी (ता. ११) महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदला अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळाला.
महाविकास आघाडीच्या ‘बंद’ला वऱ्हाडात प्रतिसाद Wedding response to Mahavikas Aghadi's 'Bandh'
महाविकास आघाडीच्या ‘बंद’ला वऱ्हाडात प्रतिसाद Wedding response to Mahavikas Aghadi's 'Bandh'

अकोला : लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, न्याय मिळावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीने सोमवारी (ता. ११) महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदला अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळाला. बंदच्या समर्थनात बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. लखीमपूर खेरीमध्ये भाजप नेत्याच्या पुत्राने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना झाली होती. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा, शेतकऱ्यांना न्यायाच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बंदचे आवाहन केले होते. अकोल्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून बंद पाळण्याबाबत व्यावसायिकांना आवाहन केले. बंद दरम्यान वाहतूक, दैनंदिन जीवनाश्‍यक वस्तूची दुकाने, दवाखाने सुरळीतपणे सुरू होती. बुलडाण्यासह, खामगाव, चिखली, देऊळगावराजा, मलकापूर, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, लोणार, मेहकर, सिंदखेडराजा आदी तालुक्यांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी पुढाकार घेतला. वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये बंदमुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद होती. सर्वच ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपानंतर अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यात आली होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com