खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापन

जगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के) असून त्या खालोखाल कीटकनाशके (२९.७ टक्के), बुरशीनाशके (२०.६ टक्के) व अन्य रसायनांचा (६.१ टक्के) आहे. भारतात तणनाशकाचा वापर फक्त १२ टक्के असून कीटकनाशकांचा मात्र ७५ टक्के एवढा आहे.
Infestation of weeds in maize
Infestation of weeds in maize

जगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के) असून त्या खालोखाल कीटकनाशके (२९.७ टक्के), बुरशीनाशके (२०.६ टक्के) व अन्य रसायनांचा (६.१ टक्के) आहे. भारतात तणनाशकाचा वापर फक्त १२ टक्के असून कीटकनाशकांचा मात्र ७५ टक्के एवढा आहे.

भारतात सर्वात जास्त तणनाशकांचा वापर प्रामुख्याने भात, गहू, सोयाबीन, कापूस, भुईमूग, ऊस, मसाले, चहा व कॉफी आदी पिकांमध्ये होतो. एकात्मिक पद्धतीच्या वापराला तणनाशकांची जोड देताना लेबल क्लेमनुसार व गरजेएवढाच त्यांचा वापर करून प्रभावी तण नियंत्रण साधता येते. कोणामुळे किती नुकसान?

नुकसान करणारा घटक उत्पादनात येणारी घट (टक्के)
कीटक २९
रोग २२
तणे ३७
धान्य साठवणीतील कीड, उंदीर, घुशी व अन्य १२

अनियंत्रित तणांमुळे खरीप व रब्बी पिकांच्या उत्पादनात आढळणारी घट (टक्के)

पीक उत्पादनात होणारी घट पीक
ज्वारी ४०-४५
भुईमूग ४०-४५
बाजरी २५-३०
सूर्यफूल ३०-३३
मका ४०-४५
करडई ३०-३५
सोयाबीन ४०-५३
कापूस ७४-८९
तूर ५०-५५
ऊस ५५-६०

तणांद्वारे जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये शोषून घेण्याचे प्रमाण

पिके अन्नद्रव्ये शोषून घेण्याचे प्रमाण (किलो प्रति हेक्टर)
नत्र स्फुरद पालाश
ज्वारी ३६-४६ ११-१८ ३१-४७
तूर २८ २४ १४
मूग ८०-१३२ १७-२० ८०-१३०
सोयाबीन २६-६५ ३-११ ४३-१०२

पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी

पीक कालावधी (पेरणीनंतरचे दिवस)
मूग, उडीद १५ ते ३०
बाजरी १५ ते ३५
खरीप ज्वारी, सूर्यफूल, भात (स्थलांतरित) सोयाबीन, भुईमूग (उपट्या) १५ ते ४५
भुईमूग (पसऱ्या), कापूस, तूर २० ते ६०
ऊस २० ते १२०
पेरभात पूर्णवेळ

हा कालावधी निरनिराळ्या भागात हवामानानुसार कमी-अधिक होऊ शकतो. एकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापन व्याख्या विविध पिकातील तणांचे नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध सर्व पद्धतींचा सुसंगतपणे अवलंब करून व तणनाशकांचा कमीत कमी वापर करून तणनियंत्रण. यातील घटक

  • उत्तम मशागत
  • पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था
  • पेरणी अगोदर वखराची पाळी (जांभूळवाही)
  • शक्‍य तेथे चौफुलीचा वापर
  • योग्य पिकाची निवड
  • पीक फेरपालट
  • आंतरपीक पद्धत
  • शुद्ध प्रमाणित बियाण्याचा वापर
  • स्वच्छता
  • वेळेवर पेरणी
  • झाडांची अपेक्षित संख्या
  • विरळणी
  • संतुलित खताचा वापर
  • दोन ते तीन वेळा डवरणीच्या पाळया व एक ते दोन निंदणीच्या पाळया
  • तणनाशकांचे प्रकार निवडक

  • मुख्य पिकास कोणत्याही प्रकारची हानी न पोचवता फक्त तण नियंत्रण करतात
  • उदा. क्विझालोफॉप ईथाईल, इमॉजीथायपर
  • अनिवडक सर्वप्रकारच्या वनस्पतींचा तणांसह बंदोबस्त करतात. उदा. ग्लायफोसेट रासायनिक तण नियंत्रण (प्रति १० लीटर पाण्यासाठी) भात

  • पेंडीमिथॅलीन ३० ईसी- ५० मिली- रोवणीनंतर ४ ते ७ दिवसांत
  • प्रेटिलॅक्लोर ३० इ डब्ल्यू अधिक पायरॅझोसल्फुरॉन इथाईल -५०-६० मिली- उगवणपुर्व पेरीव भातासाठी
  • अझीमसल्फुरॉन ५० इसी- २ ते ३ ग्रॅम- रोवणी तसेच पेरीव भात पिकात लागवडीनंतर २५ दिवसांनी उगवण पश्‍चात फवारणी. ३०० लीटर पाणी प्रति हेक्‍टर
  • बिसपायरीबॅक सोडीयम १० एससी ६ ते ७ मिली- रोपवाटीकेत १०-१२ दिवसांनी उगवण पश्‍चात किंवा रोवणीनंतर १०-१५ दिवसांनी फवारणी
  • इथॉक्सोसल्फुरॉन १५ टक्के डब्ल्यूडीसी- १.६६ ते २ ग्रॅम- उगवण पश्‍चात
  • पायरॅझोसल्फुरॉन इथाईल १० इडब्ल्यू- २ ते ग्रॅम- रोवणीनंतर ४ ते ७ दिवसांत उगवण पश्‍चात
  • मेटसल्फ्युरॉन मिथाईल १० टक्के अधिक क्‍लोरीम्युरॉन इथाईल १० डब्ल्यूपी -०.३५ ग्रॅम- उगवणपूर्व रोवणीनंतर ३ दिवसांपर्यंत फवारणी
  • मका

  • ॲट्रॉझीन ५० डब्ल्यूपी- १५-३० ग्रॅ. उगवणपूर्व
  • टेम्बोट्रायॉन ३४.४ एससी- ६ मिली- उगवण पश्‍चात- पीक ३०-४० दिवसांचे असताना
  • टोप्रामेझॉन ३३.६ एससी- १.५ मिली- उगवण पश्‍चात- पीक ३०-४० दिवसांचे असताना
  • हॅलोसल्फुरॉन मिथाईल ७५ टक्के डब्ल्यूपी- २.४ ग्रॅम- उगवणपश्‍चात- पेरणीनंतर २५-३० दिवसांनी
  • सोयाबीन

  • पेंडीमिथॅलीन ३८.७ सीएस- २० ते ३५ मिली- उगवणपूर्व
  • डायफ्लोसुलम ८४ टक्के डब्ल्यूडीजी- ०.४२ ग्रॅम- उगवणपूर्व, फक्त सोयाबीन सलग पिकात
  • सल्फेक्‍ट्राझॉन ३९.६ टक्के- डब्ल्यूएससी- १५ मिली- उगवणीपूर्व
  • पेंडीमिथॅलीन ३० अधिक इमॅझीथायपर २ टक्के इसी- ५० ते ६० मिली- उगवणीपूर्व
  • इमॅझीथायपर १० टक्के डब्ल्यूएसएल- १५ ते २० मिली- उगवणीपूर्व किंवा सलग पिकात उगवण पश्‍चात. पीक १५ ते २० दिवसांचे असताना द्रावणात अमोनियम सल्फेट व प्रसारकद्रव्य योग्य मात्रेत व योग्य प्रमाणात मिसळून फवारावे
  • इमॅझीथायपर अधिक इमॅओमॉक्‍स ७० डब्ल्यूजी-२ ग्रॅम- उगवणपश्‍चात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना- किंवा तण २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी
  • द्रावणात प्रसारक द्रव्ये १.५ मिली प्रति लीटर पाणी अधिक २ ग्रॅम अमोनियम सल्फेट.
  • क्‍लोरीम्युरॉन इथाईल २५ डब्ल्यूपी- ०.८ ग्रॅम- उगवणीपश्‍चात- पीक १० ते २० दिवसांचे असताना प्रसारक द्रव्य मिसळून घ्यावे.
  • क्विझॅलोफॉप पी ईथाईल ५ इसी- २० मिली- उगवणीपश्‍चात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्य १० मिली प्रति लीटर पाण्यात मिसळावे.
  • प्रोपॅक्विझाफॉप १० इसी-१५ मिली- उगवणपश्‍चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना
  • प्रोपॅक्विझाफॉप २.५ टक्के अधिक इमॅझीथायपर ३.७५ टक्के डब्ल्यू डब्ल्यूएम इ- ४० मिली- उगवणपश्‍चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना
  • सोडियम ॲसिफ्लोरोफेन १६.५ टक्के अधिक क्‍लोडोनीफोप प्रोपॅजील १० इसी- २० मिली- उगवणपश्‍चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना
  • भुईमूग

  • इमॅथीथॅपायर १० टक्के एस एल- २० ते ३० मिलि - उगवणपूर्व तसेच सलग पिकात उगवणीपश्‍चात.
  • इमॅथीथॅपायर ३५ टक्के अधिक इमॅझामॉक्‍स ३५ टक्के- २ ग्रॅम - उगवणीपश्‍चात पीक १५ ते २० दिवसाचे असताना किंवा तण २-३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी. द्रावणात स्टिकर १.५ मिलि/ लिटर पाणी, २० ग्रॅम अमोनियम सल्फेट.
  • क्विझूलोफॉप पी ईथाईल ५ टक्के ईसी - १५ ते २० मिलि - पीक १५ ते २० दिवसाचे असताना द्रावणात ०.०५०० अमोनियम सल्फेट आणि स्टिकर मिसळून फवारणी.
  • उडीद

  • फिनॉक्‍झीप्रॉप पी ईथील १९.३ टक्के डब्ल्यु डब्ल्यु ई सी - १२.५ ते १५ मिलि - उगवणीपश्‍चात पीक १५-२० दिवसाचे असताना फवारणी. त्यानंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
  • प्रोपॅक्विझाकॉप १० टक्के ईसी - १५ मिलि - उगवणीपश्‍चात, उभ्या पीक १५ ते २० दिवसाचे असताना.
  • क्विझॉलॉफॉप पी ईथाइल ५ टक्के ईसी - २० मिलि- उगवणीपश्‍चात, पीक १५ ते २० दिवसाचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
  • तूर पेंडीमेथॅलीन ३० टक्के ईसी - ३५ ते ५० मिलि - उगवणीपूर्व कपाशी

  • पेंडीमेथॅलीन ३८.७ टक्के सी एस - २०-२५ मिलि - उगवणीपूर्व
  • डायुरॉन ८० टक्के डब्ल्यू.पी.- २०-३० मिलि- उगवणीपूर्व
  • पयरीथीओबॅक सोडीयम १० टक्के ईसी-  १२.५-१५ मिलि- उगवणीपूर्व
  • क्विझॉलोफॉप ईथाईल ५ टक्के ईसी- २० मिलि- उगवणीपश्‍चात, पीक २० ते ३० दिवसाचे असताना,फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये.
  • फिनॉक्‍झिप्रॉफ पी इथील ९.३ टक्के डब्ल्यू डब्ल्यू ईसी - १५ मिलि- उगवणीपश्‍चात उभ्या पिकात तृणवर्गीय तणे ३० ते ४० दिवसांची असताना. फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात स्टिकर १० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळावे.
  • ग्युफोसिनेट अमोनियम १३.५ टक्के- ५० ते ६० मिलि- उगवणीपश्‍चात
  • पयरीथीओ बॅक सोडियम ६ टक्के ईसी अधिक क्विझॅनोफॉप इथील ४ टक्के ईसी- २५ मिलि- उगवणी पश्‍चात उभ्या पिकात. पीक २० ते ३० दिवसांचे असताना फवारणी.
  • ऊस

  • सलफेक्‍ट्राझॉन ३९.६ टक्के डब्ल्यू डब्ल्यू एस.सी.- ३० मिलि- उगवणीपूर्व
  • हॅलोसल्फुरॉन मिथील ३८ टक्के डब्ल्यू पी- १.६ ते १.८ मिलि- उगवणी पश्‍चात, लव्हाळा तणाचे प्रभावी नियंत्रण.
  • मेटासल्फुरॉन मिथील ३० टक्के डब्ल्यू.पी.- ०.६ ग्रॅम- उगवणीपश्‍चात ३० ते ४० दिवस, रूंद पानांच्या तणांसाठी.
  • कांदा

  • पेंडीमेथेलिन ३८.७ टक्के सीएस- २५ मि.लि- रोवणीनंतर २ ते ३ दिवसात तण उगवणीपूर्व.
  • ऑक्‍सीक्‍लुर फेन २३.५ टक्के ईसी - ८ ते १२ मिलि- उगवणी पश्‍चात, रोवणीनंतर १५ ते २० दिवसांनी पिकात फवारणी. रूंद पानी तणांचे प्रभावी, अरूंद पानी तणांचे काही अंशी नियंत्रण.
  • प्रोप्याक्विझाफॉप १० टक्के ईसी- १२.६ मिलि- उगवणीपश्‍चात उभ्या पिकात, पीक १५ ते २० दिवसांचे असताना फवारणी.
  • क्विझॅलोफॉप ईथाईल ५ टक्के ईसी- १५ ते २० मिलि- उगवणी पश्‍चात पीक १५ ते २० दिवसांचे असताना फवारणी.
  • प्रोपॅक्विझॅफोप ५ टक्के अधिक ऑक्‍सिफ्लोरफेन १२ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू- १८ ते २० मिलि- उगवणीपश्‍चात, रोवणीनंतर १५ ते २० दिवसांनी पिकात फवारणी. रुंद व अरुंद पानी तणांचे प्रभावी नियंत्रण.
  • टीप-

  • जमिनीवर व पिकातील फवारणीसाठी अनुक्रमे ७०० ते ५०० लीटर पाणी प्रती हेक्‍टरी वापरावे.
  • पेरणीपूर्वी म्हणजे पेरणी आधी, उगवणपूर्व अंकुर जमिनीच्या पृष्ठभागावर येण्याआधीच्या काळात केलेली फवारणी
  • आंतरपीक पद्धतीत तणनाशकांचा वापर

  • परिस्थितीनुसार वरील कोणतेही एक तणनाशक दिलेल्या पिकासाठी वापरावे
  • जमिनीवरील व पिकातील फवारणीसाठी अनुक्रमे ७०० ते ५०० लीटर प्रति हेक्‍टर पाण्याची मात्रा वापरावी
  • तणनाशकांची मात्रा त्या त्या पिकासाठी क्षेत्रानुसार वापरावी.
  • तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती, तणांचा तसेच जमिनीचा प्रकार व हवामानानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी

  • लेबल क्लेमनुसारच वापर करावा.
  • ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये.
  • वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी फवारणी करावी. स्वच्छ पाणी वापरावे.
  • जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित जमिनीवर फवारावे. तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोचू शकत नाही. पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही.
  • उगवणीपूर्व फवारणी पेरणीदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये.
  • उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
  • तणनाशकांकासाठी वेगळा पंप ठेवावा. ते शक्‍य नसल्यास तणनाशक फवारल्यानंतर संपूर्ण पंप (नळयांसहित) साबणाच्या पाण्याने २ ते ३ वेळा व नंतर साध्या पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुऊन घ्यावा. जेणेकरून तणनाशकाचा अंश त्यात शिल्लक राहणार नाही.
  • फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही.
  • फवारणी यंत्राचे अंशीकरण करून घ्यावे. अंशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठरावीक क्षेत्रात किती द्रावण फवारले गेले हे तपासून घेणे. सर्वत्र सारख्या दाबाखाली फवारणी करावी.
  • तृणवर्गीय पिकात मूग, उडीद यासारखी द्विदलवर्गीय पिके असल्यास २,४-डी या तणनाशकाची फवारणी करू नये. कारण द्विदल वर्गीय पिके नष्ट होतील. इस्टर स्वरूप वापरू नये. पॉवर पंप वापरू नये.
  • तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर वापर करावा.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी.
  • तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रासायनिक तणनाशक अंश व्यवस्थापन

  • शिफारशीच्या मात्रेतच वापर करावा
  • वारंवार एकच तणनाशक न वापरता आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्‍चात तणनाशक वापरावे.
  • फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.
  • सेंद्रिय खताचा हेक्‍टरी १० ते १५ टन वापर केल्यास जमिनीतील तणनाशकाचे अंश धरून ठेवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुध्दा वाढते.
  • खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो. त्यामुळे तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.
  • संपर्क- डॉ. जे. पी. देशमुख- ७५८८८८४६४९ (कृषिविद्यावेत्ता, तण व्यवस्थापन प्रकल्प, कृषी विद्याविभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com