कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
ताज्या घडामोडी
अमरावतीत आठवडाभर लॉकडाऊन जाहीर
मुंबईनंतर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती तसेच अचलपूर शहरामध्ये एका आठवड्यासाठी कडकडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.
अमरावती : मुंबईनंतर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती तसेच अचलपूर शहरामध्ये एका आठवड्यासाठी कडकडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २२) रात्री आठपासून लॉकडाउन लावण्यात आले. एक आठवडाभर जीवनावश्यक बाबी वगळता सर्व प्रतिष्ठाने, व्यापार, व्यवसाय, लग्न समारंभ बंद राहणार आहेत.
वारंवार आवाहन करून सुद्धा अमरावतीकरांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाइलाजास्तव लॉकडाउनचा निर्णय जाहीर करावा लागला, असे पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या संदर्भात त्यांनी रविवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला.
पालकमंत्री म्हणाल्या, ‘‘अमरावती तसेच अचलपूरमध्ये सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळून येत असल्याने हे दोन्ही शहर कंन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोरोनाची झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती उपलब्ध नाही. नागरिकांची तारांबळ उडता कामा नये, यासाठी सोमवारी दिवसभर अनलॉक राहणार असून, रात्री आठनंतर लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.’’
अमरावतीचा मृत्यूदर १.६ टक्के
अमरावतीमध्ये कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असले तरी मृत्यूदर मात्र राज्याइतकाच म्हणजे १.६ टक्के आहे. ही दिलासादायक बाब आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने दाखल आहेत. १४०० बेड्सची क्षमता असली तरी आणखी २०० बेड्स नव्याने वाढविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
- 1 of 1065
- ››