सोलापूर ‘आठवडी’सह जनावरे बाजार बंद

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध कडक केले असून, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारासह जनावर बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
cattle market
cattle market

सोलापूर ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध कडक केले असून, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारासह जनावर बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचेही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच रात्रीची संचारबंदी रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत पूर्वीप्रमाणेच कायम राहील. हॅाटेल आणि बार यांची वेळ रात्री आठपर्यंत आणि घरपोच सेवा देणाऱ्यांना रात्री १० पर्यंत मुभा देण्यात आली आहे. नव्याने लागू झालेले आदेश हे ३१ मार्चपर्यंत असतील. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे.  बाजार समित्यांतही निर्बंध जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लिलावासाठी येणाऱ्या शेती मालाच्या प्रकारानुसार बाजार समितीने नियोजन करावे, एकाच दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाचे दिवस आणि वेळा विभागून द्याव्यात, याचे नियोजन जिल्हा उपनिबंधक तालुकास्तरावर संबंधित उपनिबंधक आणि बाजार समित्यांशी समन्वय ठेवून करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे. असे आहेत निर्बंध 

  • प्रत्येक शनिवार व रविवारी सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. यातून जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्र वितरण या घटकांना सवलत दिली आहे.
  • जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्पलेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. 
  • सर्वप्रकारची धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. 
  • धार्मिक विधीमध्ये पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com