agriculture news in Marathi weekly and animal markets closed in Solapur Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सोलापूर ‘आठवडी’सह जनावरे बाजार बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 मार्च 2021

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध कडक केले असून, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारासह जनावर बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

सोलापूर ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध कडक केले असून, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारासह जनावर बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचेही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच रात्रीची संचारबंदी रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत पूर्वीप्रमाणेच कायम राहील. हॅाटेल आणि बार यांची वेळ रात्री आठपर्यंत आणि घरपोच सेवा देणाऱ्यांना रात्री १० पर्यंत मुभा देण्यात आली आहे. नव्याने लागू झालेले आदेश हे ३१ मार्चपर्यंत असतील. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे. 

बाजार समित्यांतही निर्बंध
जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लिलावासाठी येणाऱ्या शेती मालाच्या प्रकारानुसार बाजार समितीने नियोजन करावे, एकाच दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाचे दिवस आणि वेळा विभागून द्याव्यात, याचे नियोजन जिल्हा उपनिबंधक तालुकास्तरावर संबंधित उपनिबंधक आणि बाजार समित्यांशी समन्वय ठेवून करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

असे आहेत निर्बंध 

  • प्रत्येक शनिवार व रविवारी सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. यातून जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्र वितरण या घटकांना सवलत दिली आहे.
  • जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्पलेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. 
  • सर्वप्रकारची धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. 
  • धार्मिक विधीमध्ये पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...