नांदेड जिल्ह्यात आठवडे बाजार बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन लागू केला आहे.
Weekly market ban in Nanded district has caused huge losses to farmers
Weekly market ban in Nanded district has caused huge losses to farmers

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन लागू केला आहे. यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गुजराण होणाऱ्या आठवडी बाजार बंदीमुळे भाजीपाल्याची मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिना उजडताच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. फेब्रुवारीत खालावलेली संख्या मार्च उजडताच दोन अंकावरील संख्या तीन अंकावर पोचली. दरम्यान ११ मार्च रोजी २५० वर संख्या पोचल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी १२ ते २१ मार्च दरम्यान अंशतः: लॉकडाऊनची घोषणा केली.

यात शहरासह ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारावर संक्रांत आली. यामुळे उन्हाळ्याचे नियोजन करून पिकविलेल्या भाजीपाला उत्पादकांसह फळे पिकविणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजार बंद असल्यामुळे व्यापारी टरबुजाचे दर पाडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नांदेड शहरात महादेव दालमील, इतवारा, पूर्णा रोड अशा तीन ठिकाणी आठवडे बाजार भरतात. यासोबतच शहरातील तरोडा नाका भागात दररोजच भाजीपाला बाजारा भरतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तालुकास्तरासह महसुल मंडळस्तरीय गावे, मुख्य रस्त्यावरील गावात आठवडी बाजार भरतो. परंतु आठवडी बाजार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मिळेल त्या ठिकाणी कमी भावाने विक्री करावा लागत आहे. 

शहरात शुक्रवारी (ता. १२) महादेव दालमील भागात भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बाजारात बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. काहींनी कवडीमोल दराने भाजीपाला विक्री करून घर गाठले.

शुक्रवारी बाजार बंद असल्यामुळे ग्राहक मिळाले नाहीत. परिणामी, ६० ते ८० रुपये प्रमाणे विकणारा शेवगा २० रुपये किलो प्रमाणे देवून जावे लागले. - सदाशिव पाटील, मालेगाव, ता. अर्धापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com