पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश 

कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश  Weekly market in Pune district Order to start
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू करण्याचे आदेश  Weekly market in Pune district Order to start

पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.  कोरोना आढावा बैठकीत शुक्रवारी (ता. २२) पवार यांनी या सूचना दिल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.  पवार म्हणाले, ‘‘सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लसीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे.’’  डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी.’’ 

लसीकरणासाठी विशेष मोहीम  बैठकीत राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे ७ ते ११ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. मागील ३ आठवड्यांत पुणे महानगरपालिका क्षेत्रात आणि १५ ऑक्टोबर रोजी पुणे ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ठिकाणी वीकेएण्ड कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून, ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरण नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत ८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ४ लाख २७ हजार लसीकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com