agriculture news in Marathi weekly market will start in Pune district Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार सुरू होणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद असलेले पुणे जिल्ह्यातील गाव पातळीवरील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार आहेत.

पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद असलेले पुणे जिल्ह्यातील गाव पातळीवरील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल राम राम यांनी दिले आहेत.  

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तेरा मार्च रोजी गावपातळीवर भरणारे सर्वच प्रकारचे आठवडे बाजार बेमुदत बंद करण्याचे आदेश दिला होता. आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका छोट्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. ग्रामीण भागातील अर्थकारणावरही याचा परिणाम झाला होता. 

आठवडे बाजार सुरू करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आठवडे बाजार सुरू करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन न झाल्यास, अटीचे उल्लंघन होणारे आठवडे बाजार तात्काळ बंद करण्यात येतील, असेही नवल किशोर राम यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 

या सूचनांचे करावे लागणार पालन

  • आठवडे बाजारात नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक. 
  • रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा
  • दुकाने आणि ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे
  • गुटखा, पान, तंबाखू खाणे, मद्यपानास मनाई
  • बाजाराची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग वारंवार निर्जंतुक करावे
  • प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅन, हात धुणे, सॅनिटायझरची ग्रामपंचायतींनी व्यवस्था करावी. 

किकवीचा गुरांचा बाजार होणार सुरू
पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले आठवडे बाजार आजपासून सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील गुरांचे बाजारही सुरू करण्यात येत आहे. भोर तालुक्यातील किकवी येथील गुरांचा बाजारही सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिले. मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. शेतीसाठी पशुधन उपलब्ध व्हावे यासाठी किकवी येथील गुरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी शिवतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर काही क्षणातच हा बाजार सुरू करण्यात येत असल्याचे भोरचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी शिवतरे यांना कळविले.
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...