agriculture news in marathi, weekly Poultry analysis | Agrowon

खप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार स्थिरावणार
दीपक चव्हाण
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

उत्तर भारतातील श्रावण संपला आहे, तर महाराष्ट्रात दुसरा पंधरवडा सुरू आहे. चालू आठवड्यापासून मागणीत वाढ होऊन सध्याच्या पातळीवर बाजारभाव स्थिरावेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

नाशिक विभागात शनिवारी (ता. २५) रोजी ६६ रु. दरम्यान लिफ्टिंग झाले. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव चार रु. ने नरमले आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत श्रावणचा पहिला पंधरवडा हा बाजारभावाच्या दृष्टीने सकारात्मक राहिला आहे. 

खडकेश्वर हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले की, शनिवारी (ता. २५) रोजी लिफ्टिंगमध्ये वाढ झाली. मागील आठवड्यातील तीन दिवस बकरी ईदमुळे कमी प्रमाणात लिफ्टिंग झाले. परिणामी पॅनिक सेलिंग वाढले होते. तथापि, शनिवारी परिस्थिती सुधारली. रविवार आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने मागणी वाढली. रविवारचे (ता. २६) रिटेल सेलिंगही चांगले होते. गुजरातमध्ये ६७ - ६८ रु. तर आंध्र व कर्नाटकात ७० ते ७२ दरम्यान बाजारभाव आहे. उत्तर भारतातील श्रावण संपल्यामुळे तेथील मागणी सुधारेल. पुढच्या आठवड्यात ब्रॉयलर पुरवठा कमी राहील. एकंदरीत महिन्याचा शेवटचा आठवडा असला तरी सध्याचा बाजारभाव टिकून राहू शकतो. यासाठी सर्वांनी सव्वा दोन किलोच्या आतच वजने राखली पाहिजेत. पुरवठा घटल्याने हॅचिंग एग्ज बाजारभाव १९.५० पर्यंत सुधारला आहे. पुढील आठवड्यात चिक्सच्या बाजारभावात सुधारणा शक्य आहे. ३१ ते ५ सप्टेंबर दरम्यान बाजारात पिल्लांची उपलब्धता राहणार नाही.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण यांनी सांगितले, की मागील आठवड्यात ब्रॉयलर मार्केट ३ ते ४ रुपयांनी नरमले. बकरी ईदमुळे प्रामुख्याने खप घटला. मात्र, मागणीनुसार पुरवठ्याच्या नियोजनामुळे वजने आणि संख्याही नियंत्रणात होती. दक्षिण भारतात तेलंगणा व कर्नाटकातील जोरदार मागणीमुळे बाजारभाव ७० रु. वर पोचले आहेत. उत्तर भारतातील श्रावण संपला आहे. तर महाराष्ट्रात दुसरा पंधरवडा सुरू आहे. परिणामी मागणीत वाढ होऊन त्याचे रुपांतर बाजारभावात दिसू शकते.
पुढील आठवड्यात बाजारभाव ६५ रु. दरम्यान स्थिरावतील, असे नाशिक येथील ज्युपिटर अॅग्रोचे संचालक डॉ. सीताराम शिंदे यांनी म्हटले आहे. शेजारी राज्यातील बाजारभाव महाराष्ट्रापेक्षा उंच आहेत. महाराष्ट्रातील वजने आणि संख्या संतुलित आहे. त्यामुळे विक्रीसाठी कुठलाही दबाव नाही. म्हणून येत्या आठवड्यांत महाराष्ट्रातील बाजारभाव वर नेण्यासाठी पूरक परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या दोन आठवड्यांपासून टेबल एग्जचे बाजारभाव स्थिरावले आहेत. सध्याचा बाजार उत्पादन खर्चाच्या आसपास आहे. श्रावणातील घटत्या मागणीचा अंड्याच्या बाजाराला फटका बसला आहे. चालू आठवड्यातील सरासरी विक्री दर ३४० रु. दरम्यान आहे. तथापि, अनेक विभागात पॅनिक सेलिंगमुळे पेपर रेटच्या तुलनेत मोठ्या फरकाने बाजार तुटल्याचे पहावयास मिळाले. प्रतिशेकडा ३०० रु. खाली माल विकल्याच्या नोंदी आहेत.
 

प्रकार भाव (रु) परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६६ प्रतिकिलो नाशिक
चिक्स २५ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज १९.५० प्रतिनग मुंबई
अंडी ३०५ प्रतिशेकडा पुणे

आषाढ असो की श्रावण, किफायती भाव मिळण्यासाठी एकच सूत्र आहे. ब्रॉयलर्सची वजने सव्वा दोन किलोच्या आत ठेवणे.
- संजय नळगीरकर

इतर अॅग्रोमनी
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई  ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...
सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...