agriculture news in marathi weekly weather by dr. ramchandra sabale | Agrowon

उष्ण, कोरडे हवामान , काही जिल्ह्यात पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 24 मे 2020

महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा कमी दाब राहील. मध्य भारतावर १००४ हेप्टापास्कल तर उत्तरेस काश्मीरजवळ १००२ हेप्टापास्कल आणि आठवड्याच्या अखेरीस १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. दक्षिणेस केरळजवळ १००८ हेप्टापास्कल आणि हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मान्सून वारे दक्षिणेकडून नैऋत्येकडून भारताच्या उत्तरेस वाहतील. हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणण्याचे काम करतील.

महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा कमी दाब राहील. मध्य भारतावर १००४ हेप्टापास्कल तर उत्तरेस काश्मीरजवळ १००२ हेप्टापास्कल आणि आठवड्याच्या अखेरीस १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. दक्षिणेस केरळजवळ १००८ हेप्टापास्कल आणि हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मान्सून वारे दक्षिणेकडून नैऋत्येकडून भारताच्या उत्तरेस वाहतील. हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणण्याचे काम करतील.

केरळमध्ये मान्सूनच्या पावसास मे अखेरीस सुरवात होईल. मान्सूनने अंदमानचा पूर्ण भाग व्यापल्यानंतर केरळच्या दिशेने आगेकूच करेल व महाराष्ट्रात वेळेवर दाखल होईल. तसेच सध्याचे हवेचे दाब असे दाखवतात, की मान्सून वारे केरळामधून तळ कोकण, मुंबई त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ तसेच उत्तरेस फारसे अडथळा न येता आगेकूच करतील. या आठवड्यात विदर्भातील कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तर अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहील. किमान तापमानातही २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील.

कोकण 
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत रविवार व सोमवारी ६ ते १० मिमी पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर इतका कमी राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस तर ठाणे जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ७३ टक्के, रायगड जिल्ह्यात ८६ टक्के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ४९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ४४ ते ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात ९ किलोमीटर, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी ११ किलोमीटर व धुळे जिल्ह्यांत ताशी १५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मराठवाडा
नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस तर बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २६ टक्के राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. नांदेड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी १३ किलोमीटर तर उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत ताशी १४ किलोमीटर राहील. लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १५ किलोमीटर तर हिंगोली जिल्ह्यात ताशी १६ किलोमीटर व जालना जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर अकोला व वाशिम जिल्ह्यांत ४६ अंश सेल्सिअस व अमरावती जिल्ह्यात ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस तर वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती व वाशिम जिल्ह्यांत १५ ते १८ टक्के तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत २२ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वाशिम जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यांत १२ ते १४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४६ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ४८ टक्के तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४० ते ४१ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४५ ते ४९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर व दिशा आग्नेयेकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात रविवार व सोमवार (ता.२४ व २५) रोजी ८ ते १० मि.मी. तर पुणे जिल्ह्यात सोमवार (ता.२५) रोजी ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किलोमीटर राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६२ टक्के, सातारा जिल्ह्यात ७६ टक्के तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ८३ ते ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरीत जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला

  • भात रोपवाटिका तयार करावी. गादीवाफे तयार करण्यापूर्वी १ गुंठा क्षेत्रास २५ किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद, ५०० ग्रॅम पालाश द्यावे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी १० गुंठे क्षेत्रावर ४० किलो बियाणे पेरावे.
  • फळबाग लागवडीसाठी शिफारशीत अंतरावर खड्डे तयार करावेत.
  • खरीप हंगामातील लागवडीसाठी दर्जेदार बियाणे, खते,जिवाणूसंवर्धकांची खरेदी करावी. लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.

- ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...