पूर्व मोसमी पावसाची शक्‍यता, तापमान घटण्यास सुरुवात

कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये याच आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची शक्‍यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होऊन तो पश्‍चिम किनारपट्टीकडून मुंबईच्या दिशेने आणि महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होईल. अशी सध्याची हवामान स्थिती दाखवते. मात्र वाऱ्याचा ताशी वेग अद्याप कमी असल्याने मान्सूनला सुरुवातीच्या टप्प्यात जोर कमी राहणे शक्‍य आहे.
weekly weather
weekly weather

कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये याच आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची शक्‍यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होऊन तो पश्‍चिम किनारपट्टीकडून मुंबईच्या दिशेने आणि महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होईल. अशी सध्याची हवामान स्थिती दाखवते. मात्र वाऱ्याचा ताशी वेग अद्याप कमी असल्याने मान्सूनला सुरुवातीच्या टप्प्यात जोर कमी राहणे शक्‍य आहे. महाराष्ट्रावरील हवेचे दाब बदलून ते दक्षिण भारतासह १००८ हेप्टापास्कल इतके होतील. हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब असेल. अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील. मान्सून केरळवर दाखल होऊन त्याची वाटचाल सुरु राहील. उत्तर भारतातील हवेचे दाब कमी राहण्यामुळे वारे नैऋत्य दिशेने भारतात प्रवेश करेल. कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये याच आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची शक्‍यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होऊन तो पश्‍चिम किनारपट्टीकडून मुंबईच्या दिशेने आणि महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होईल. अशी सध्याची हवामान स्थिती दाखवते. मात्र वाऱ्याचा ताशी वेग अद्याप कमी असल्याने मान्सूनला सुरुवातीच्या टप्प्यात जोर कमी राहणे शक्‍य आहे. या आठवड्यात कोकणात काही दिवशी ३५ ते ४० मि.मी., उत्तर महाराष्ट्रात १७ ते १८ मि.मी., मराठवाड्यात ३९ ते ५७ मि.मी., पश्‍चिम विदर्भात २५ ते ४४ मि.मी., मध्य विदर्भात ७ ते ३२ मि.मी., पूर्व विदर्भात १० ते ११ मि.मी., तर दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रात ३५ ते ४५ मि.मी. पावसाची शक्यता दिसते. हवामान ढगाळ राहील. मेघ गर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.

कोकण सिंधुदूर्ग जिल्ह्यात २० ते ३५ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात २० ते ४८ मि.मी., रायगड जिल्ह्यात ३८ मि.मी., ठाणे जिल्ह्यात १८ ते ३७ मि.मी. या आठवड्यात रविवारी व सोमवारी पावसाची शक्‍यता आहे. यापुढेही पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदूर्ग व ठाणे जिल्ह्यात नैऋत्येकडून तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ती आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग केवळ ३ मि.मी. राहण्यामुळे पूर्व मान्सुन पावसाला जोर राहणार नाही. कमाल तापमान सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यात ३६ अंश, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २९ अंश, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ८७ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५३ टक्के राहील. हवामान पाऊस सुरु झाल्यास चांगले राहील.

मध्य महाराष्ट्र नाशिक व धुळे जिल्ह्यात रविवारी व सोमवारी १७ ते १८ मि.मी., तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात १५ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. धुळे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. तो १६ किलोमीटर राहील. नंदुरबार जिल्ह्यात ताशी १४ किलोमीटर, नाशिक व जळगाव जिल्ह्यात ताशी ७ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ४० अंश, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४१ अंश, जळगाव जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २९ अंश, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४१ टक्के राहील.

मराठवाडा उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार व सोमवारी ६ ते ५७ मि.मी., लातूर जिल्ह्यात ६ ते ४७ मि.मी., नांदेड जिल्ह्यात ५५ ते ५७ मि.मी., बीड जिल्ह्यात ९ ते ३९ मि.मी., जालना जिल्ह्यात ५ ते ४५ मि.मी. व हिंगोली जिल्ह्यात ५७ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. मराठवाड्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १३ किलोमीटर राहील. कमाल तापमान नांदेड जिल्ह्यात ४५ अंश, औरंगाबाद जिल्ह्यात ३९ अंश, उर्वरीत लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ते ४२ अंश, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी व हिंगोली जिल्ह्यात ३० अंश, तर लातूर, बीड, जालना या जिह्यात २९ अंश, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ८७ टक्के तर दुपारची २८ ते ४१ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात रविवार व सोमवारी ५ ते २५ मि.मी., अकोला जिल्ह्यात २० मि.मी., वाशिम जिल्ह्यात ११ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ५ ते ४४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाशिम जिल्ह्यात ताशी वाऱ्याचा वेग वाढेल व तो २१ किलोमीटर राहील. तर उर्वरीत जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील तर बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २९ सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३५ टक्के राहील.

मध्य महाराष्ट्र सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात ३२ मि.मी., वर्धा व नागपूर जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४५ अंश, नागपूर जिल्ह्यात ४३ अंश, व वर्धा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७२ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ रविवार व सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात ३ ते १० मि.मी., गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात सोमवारी ११ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४६ अंश, गडचिरोली जिल्ह्यात ४५ अंश, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २७ अंश, तर उर्वरीत चंद्रपुर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७४ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३३ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात रविवार व सोमवार रोजी २० ते ३५ मि.मी., सांगली जिल्ह्यात १५ ते ३८ मि.मी., सातारा जिल्ह्यात २० ते ४४ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ८ ते ४५ मि.मी., पुणे जिल्ह्यात २ ते ४४ मि.मी. व नगर जिल्ह्यात १० ते ३९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अंश, सांगली व सातारा जिल्ह्यात ३९ अंश, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व नगर जिल्ह्यात २७ अंश, तर उर्वरीत जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ५० टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला

  • पूर्व मशागतीच्या कामापैकी नांगरट व कुळवाची पाळी द्यावी. दगड, गवत व पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी.
  • आवश्‍यकतेप्रमाणे बी, बियाणे, खते, कीडनाशके इ. आवश्यक घटकांची खरेदी व नियोजन करावे.
  • फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करावेत. त्यात तळाशी पालापाचोळा व सुपर फॉस्फेट चाकून पोयटा माती, शेणखत यांच्या मिश्रणाने भरावेत.
  • पिकांना ठिबक सिंचन व पाटाचे पाणी असल्यास संरक्षित पाणी द्यावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com