पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता

मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी २० ते ५० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. काही काळ उघडीप व त्यानंतर पाऊस अशी स्थिती राहील.
weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale

मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी २० ते ५० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. काही काळ उघडीप व त्यानंतर पाऊस अशी स्थिती राहील. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण साधारण राहील महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सतत बदल होत आहेत. परतीच्या म्हणजेच ईशान्य मान्सूनची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. सोमवार (ता.७) रोजी रोजी महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्यामुळे धुळे, नंदूरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होऊन तुरळक ठिकाणी २० ते ५० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. काही काळ उघडीप व त्यानंतर पाऊस अशी स्थिती राहील. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण साधारण राहील ईशान्य मान्सूनची सुरुवात साधारणपणे १ सप्टेंबर ला होते. मात्र, राजस्थान, उत्तर भारत तसेच ईशान्य भारतात अद्याप हवेचे दाब कमी आहेत. काही ठिकाणी १००२ तर भारताच्या मध्यावर १००४ हेप्टापास्कल इतके कमी दाब आहेत. या आणि पुढील आठवड्यात हवेच्या दाबात वाढ होऊन वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. सध्या वाऱ्याच्या दिशेत बदल झाले आहेत. धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, कोकणात आग्नेयेकडून तर उर्वरित भागात नैर्ऋत्येकडून आहे. त्यामुळे ईशान्य मान्सूनसाठी वातावरण अनुकूल होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण  उद्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २६ ते २९ मि.मी. तर ठाणे व रायगड जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवार (ता.७) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २० ते ५० मि.मी. तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २२ ते ३३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ३ ते ७ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६८ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र या आठवड्याच्या सुरुवातीस नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात १६ ते २५ मि.मी. तर जळगाव जिल्ह्यात ९ ते ३६ मि.मी. तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील. धुळे जिल्ह्यात उद्या १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तर नंदूरबार जिल्ह्यात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९२ टक्के तर दुपारची ५६ ते ६२ टक्के राहील. मराठवाडा  या आठवड्यात मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २२ ते ४७ मि.मी., लातूर जिल्ह्यात १९ ते ४१ मि.मी., बीड जिल्ह्यात २५ ते ६१ मि.मी., परभणी जिल्ह्यात १३ ते ३९ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १७ ते २७ मि.मी., जालना जिल्ह्यात १७ ते ३६ मि.मी., औरंगाबाद जिल्ह्यात १४ ते ३८ मि.मी. तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड जिल्ह्यांत ३ ते ४ किलोमीटर इतका कमी राहील. हिंगोली, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किमी राहील. कमाल तापमानात बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. उर्वरित लातूर, नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवशी पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५७ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  उद्या पश्‍चिम विदर्भात २३ ते ३८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवार (ता.७) रोजी अकोला व अमरावती जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात १० ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ५९ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी १५ ते ३४ मि.मी. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात उद्या २० ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवार (ता.७) रोजी वर्धा जिल्ह्यात ४ मि.मी. तर नागपूर जिल्ह्यात पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वर्धा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९१ टक्के तर दुपारची ५५ ते ६६ टक्के राहील. पूर्व विदर्भ  उद्या चंद्रपूर जिल्ह्यात १० मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ३० मि.मी., भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवार (ता.७) रोजी चंद्रपूर जिल्ह्यात २२ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ३ ते ४ किमी राहील. कमाल तापमानात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ५९ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांच्या पूर्व भागात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. उद्या आणि परवा पुणे, नगर जिल्ह्यात ३५ ते ६० मि.मी., सांगली, सातारा जिल्ह्यात २६ ते ५० मि.मी. तर कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात १८ ते ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ३ ते ८ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ६१ टक्के राहील. या आठवड्यापासून काही काळ जोरदार पाऊस होऊन पावसात उघडीप राहील. सतत पाऊस राहणार नाही. कृषीसल्ला 

  • गोकूळ अष्टमीच्या दरम्यान जमिनीतील उपलब्ध ओलीवर रब्बी ज्वारीची पेरणी करावी. जमिनीची पूर्वमशागत करून उतारास आडव्या दिशेने पेरणी करावी.
  • घेवडा, मूग, मटकी, चवळी, बटाटा ही पिके पक्व झाली असल्यास त्यांची काढणी करावी.
  • आडसाली ऊस पिकास नत्र खताची मात्रा द्यावी. तण नियंत्रण करावे.
  • -(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com