agriculture news in marathi weekly weather by dr. ramchandra sabale | Agrowon

राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 27 सप्टेंबर 2020

ईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात झालेली असून महाराष्ट्राच्या पूर्व भागात प्रकर्षाने पाऊस होईल. याचा प्रभाव २० ऑक्टोबरपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातून मॉन्सून परतण्यास वेळ लागेल.

ईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात झालेली असून महाराष्ट्राच्या पूर्व भागात प्रकर्षाने पाऊस होईल. याचा प्रभाव २० ऑक्टोबरपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातून मॉन्सून परतण्यास वेळ लागेल.

ईशान्य भारतावरील हवेच्या दाबात वाढ झाली आहे. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १००८ हेप्टापास्कल इतकी वाढ झाली आहे. पंजाब, हरियानावरील हवेच्या दाबात  वाढ होत असून तेथे पाऊस थांबण्याच्या मार्गावर आहे. हिंदी महासागरावर हवेचे दाब वाढत आहेत. ईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात झालेली असून महाराष्ट्राच्या पूर्व भागात प्रकर्षाने पाऊस होईल. याचा प्रभाव २० ऑक्टोबरपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातून मॉन्सून परतण्यास वेळ लागेल. यापुढील काळात ज्या भागात कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार होईल तेथे पाऊस होईल. इतर भागात तापमानात वाढ होऊन ऑक्टोबर हिट जाणवेल.

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यात दनगर, औरंगाबाद, धुळे, जालना, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. मध्य व पूर्व विदर्भात पाऊस कमी झाल्याचे दिसून आले आहे. असंतुलित पावसाच्या वितरणास हवामान बदल हीच बाब प्रकर्षाने जाणवते.

कोकण 
कोकणातील नैऋत्य मॉन्सून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात काही दिवशी १६ ते २० मि.मी. तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याच्या दिशेतही बदल झाला असून ते आग्नेयेकडून वाहतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९४ टक्के तर दुपारची ७२ ते ७८ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र 
धुळे व नंदूरबार जिल्ह्यात काही दिवशी २५ ते २६ मि.मी. तर जळगाव जिल्ह्यात ३३ मि.मी., नाशिक जिल्ह्यात १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे, जळगाव जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७२ टक्के राहील.

मराठवाडा 
नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ५० ते ५५ मि. मी., जालना जिल्ह्यात ३८ ते ४० मि.मी. तर लातूर व बीड जिल्ह्यात २६ ते २७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवशी केवळ १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात बराच काळ पावसात उघडीप तर क्वचित वेळा जोराच्या पावसाची शक्यता राहील. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. बीड व जालना जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात ५ किमी, परभणी जिल्ह्यात ७ किमी तर हिंगोली व जालना जिल्ह्यात ९ किमी, बीड जिल्ह्यात १० किमी राहील. मात्र उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किमी राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर बीड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के तर दुपारची ६५ ते ८६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात काही दिवशी २६ ते २८ मि.मी. तर बुलडाणा जिल्ह्यात ३९ ते ४० मि.मी. पावसाची शक्यता राहील. कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किमी आणि दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ५० मि.मी. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते ११ किमी राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के तर दुपारची ६८ ते ८२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी २० मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात १६ मि.मी. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ४ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ८७ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
सांगली व सातारा जिल्ह्यात काही काळ पावसात उघडीप राहील. इतर जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण कमी होईल. कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ६ मि.मी., सोलापूर व पुणे जिल्ह्यात ९ मि.मी., नगर जिल्ह्यात १६ मि.मी. पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ४ कि.मी., सातारा जिल्ह्यात ५ कि.मी. व उर्वरित जिल्ह्यात ८ ते ९ किमी राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७१ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • भुईमूग, घेवडा, सोयाबीन ही पिके परिपक्व झाली असल्यास काढणी करावी. उन्हात वाळवून मळणी करून माल सुरक्षित स्थळी ठेवावा.
  • रब्बी ज्वारी, करडई या पिकांची पेरणी दोन चाड्याचे पाभरीने करावी. एका चाड्यातून बियाणे व दुसऱ्या चाड्यातून खत पेरावे.
  • भाजीपाला व फळपिकांवरील किडीच्या नियंत्रणासाठी, कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
  • पूर्व हंगामी ऊस लागवडीची तयारी सुरू करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, 
संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...