मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

या आठवड्यात कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीनंतर किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहण्यामुळे व थंड वातावरणामुळे धुके दिसून येईल.
weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale

या आठवड्यात कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीनंतर किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहण्यामुळे व थंड वातावरणामुळे धुके दिसून येईल. या आठवड्यात महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी राहणार आहेत. आज हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल तर पुढील संपूर्ण आठवडाभर १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे ईशान्येकडून येणारे वारे मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील. आणि ज्या भागात कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार होईल तेथे चांगला पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार व धुळे जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. मात्र या जिल्ह्यांच्या पूर्व भागात व जळगाव जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात चांगल्या पावसाची तर उत्तर कोकणातील रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. राजस्थान, जम्मू, काश्‍मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश तसेच गुजरातमधील कच्छ भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे तेथून मॉन्सून परतला आहे. जून ते सप्टेंबरच्या काळात अकोला जिल्ह्यात २७ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात २४ टक्के, अमरावती जिल्ह्यात २० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १८ टक्के, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांत ८ टक्के व भंडारा जिल्ह्यात ४ टक्के सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. परतीच्या मॉन्सूनमुळे या जिल्ह्यांत होणारा पाऊस उपयुक्त ठरेल. या आठवड्यात कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीनंतर किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहण्यामुळे व थंड वातावरणामुळे धुके दिसून येईल. कोकण  सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ५७ ते ७६ मि.मी. पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ५१ मि.मी., रायगड व पालघर जिल्ह्यात २८ ते ३० मि.मी., तर ठाणे जिल्ह्यात २४ ते ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर रायगड, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. दक्षिण कोकणात आकाश पूर्णतः ढगाळ तर उत्तर कोकणात अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८२ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात काही दिवशी २८ ते ३८ मि.मी., धुळे जिल्ह्यात २५ ते २६ मि.मी., नंदूरबार जिल्ह्यात १० ते ३८ मि.मी. तर जळगाव जिल्ह्यात २२ ते ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७१ टक्के राहील. मराठवाडा  उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी २९ ते ३२ मि.मी., लातूर व परभणी जिल्ह्यांत २४ ते ३० मि.मी. पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात ३० ते ३७ मि.मी., हिंगोली व जालना जिल्ह्यात १९ ते २२ मि.मी. औरंगाबाद जिल्ह्यात ८ ते २६ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. एक ते दोन तास पाऊस होऊन त्यानंतर उघडीप राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय, नैर्ऋत्य व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जालना व औरंगाबाद जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस व नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६१ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा जिल्ह्यात काही दिवशी १० ते ३० मि.मी., अकोला जिल्ह्यात २७ ते ३२ मि.मी., वाशीम जिल्ह्यात ३२ ते ४२ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ४८ ते ५८ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर वाशीम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ८९ टक्के तर दुपारची ५४ ते ६१ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ४० ते ४३ मि.मी., वर्धा जिल्ह्यात २६ ते ४० मि.मी. व नागपूर जिल्ह्यात ३० ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय, वायव्य व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची ६६ ते ६७ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी ३० ते ३३ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ३० ते ४० मि.मी., भंडारा जिल्ह्यात १६ ते २० मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात २० ते ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९७ टक्के तर दुपारची ६३ ते ७० टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात ३३ ते ८४ मि.मी., सांगली जिल्ह्यात ३५ ते ८० मि.मी., सातारा जिल्ह्यात १८ ते २९ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ३६ ते ४० मि.मी., पुणे जिल्ह्यात १८ ते २० मि.मी., नगर जिल्ह्यात २४ ते ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. कमाल तापमान सातारा जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस तर पुणे, नगर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७२ टक्के व उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ५५ ते ६४ टक्के इतकी कमी राहील. कृषी सल्ला 

  • कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत ओल असताना हरभरा पिकाच्या बियाणांची पेरणी करावी. लागवडीसाठी विजय, दिग्विजय व फुले विक्रम या हरभऱ्याच्या उत्तम जाती आहेत. पेरणीपूर्वी बियाणांस रायझोबियम जिवाणू संवर्धक चोळावे.
  • करडई पिकाच्या बियाणांची पेरणी १५ ऑक्‍टोबरपर्यंत करावी. त्यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. लागवडीसाठी सो.ओ. ८६०३२ या जातीची निवड करावी.
  • रब्बी हंगामात बागायती क्षेत्रात वाटाणा पिकाची लागवड करावी.
  • संपर्क - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य ॲग्रीकल्चर मेट्रोलॉजी फोरम फॉर साउथ एशिया

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com