agriculture news in marathi weekly weather by dr. ramchandra sabale | Agrowon

कोकण, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरवातीस कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरवातीस कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम तर उर्वरित जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

मंगळवार (ता. २०) रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होऊन ते १००६ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. हवामान बदलाचा मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव वाढत आहे. तसेच प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदवले गेले आहे. त्यामुळे ला निनाचा प्रभाव दक्षिण आशिया खंडात जाणवेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. ला निनाच्या प्रभावामुळे फेब्रुवारी २०२१ पर्यंत अवकाळी व अवेळी पावसाची शक्‍यता जाणवण्याची शक्‍यता असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे.

कोकण 
आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ४५ मि.मी. तर उद्या १४ ते १६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यातील काही दिवशी ठाणे जिल्ह्यात २६ ते २८ मि.मी. व रायगड जिल्ह्यात १५ ते २६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किमी राहील. कमाल तापमान दक्षिण कोकणात ३१ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात काही दिवशी २६ ते ४१ मि.मी., धुळे जिल्ह्यात १६ ते ४० मि.मी., नंदूरबार जिल्ह्यात २६ ते ४९ मि.मी., जळगाव जिल्ह्यात ९ ते ३४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ५ किमी इतका कमी राहील. कमाल तापमान नंदूरबार जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तसेच नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६८ टक्के राहील.

मराठवाडा 
सोमवारी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३ ते ५ मि.मी. तर बीड व परभणी जिल्ह्यात ११ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पसा पाऊस तर काही काळ उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात ७ ते १६ मि.मी., जालना जिल्ह्यात १० ते ३४ मि.मी. तसेच नांदेड जिल्ह्यात १६ ते ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर जिल्ह्यात ताशी १६ किमी, बीड जिल्ह्यात १४ किमी, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात ताशी १२ किमी राहील. हिंगोली व नांदेड जिल्ह्यात ताशी १० ते ११ किमी तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात ताशी ५ ते ९ किमी राहील. कमाल तापमान जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. तसेच उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ७१ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
अमरावती जिल्ह्यात काही दिवशी ४० ते ४६ मि.मी., बुलडाणा जिल्ह्यात २४ ते ४९ मि.मी. तसेच अकोला जिल्ह्यात ५ ते ४० मि.मी. व वाशीम जिल्ह्यात ७ ते २७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६९ टक्के राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी २६ ते ४५ मि.मी. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ११ ते २९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वर्धा व नागपूर जिल्ह्यात आग्नयेकडून तर यवतमाळ जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ६८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी ३२ ते ४३ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २४ ते ३७ मि.मी., भंडारा जिल्ह्यात २२ ते ३० मि.मी., गोंदिया जिल्ह्यात २४ ते ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किमी राहील. कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात आज २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात काही दिवशी ७ ते ८ मि.मी., पुणे जिल्ह्यात २१ ते २३ मि.मी. व नगर जिल्ह्यात ३० ते ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते १२ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यात २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९७ टक्के तर दुपारची ६८ ते ८८ टक्के राहील.

कृषीसल्ला 

  • भुईमूग शेंगांची तोडणी करून उन्हात वाळवणे गरजेचे आहे. अन्यथा शेंगातील दाणे मोडवतील व त्यात रेन्सीडिटी तयार होऊन ते कडवट होतील.
  • शेतातील उताराच्या बांधाच्या एका कोपऱ्यातून चर काढून पाण्याचा निचरा करावा. अन्यथा शेतात जास्त काळ पाणी साठल्यास पिके मरतील.
  • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
  • मोहरी पिकाची पेरणी करावी.
  • गहू पिकाच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी.

- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य ऍग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया)


इतर कृषी सल्ला
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
पिकांच्या वाढीसाठी द्या शिफारशीत...प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन...येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी,...
संरक्षित शेतीचे महत्त्वसंरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा...
नारळावरील चक्राकार पांढरी माशीरुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे...
कृषी सल्ला (भात, आंबा, काजू, नारळ,...नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या...
बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा...
कोकण, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात...महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १००४...
किफायतशीर पीक: मोहरीरब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्यावर वेळेवर पेरणी...
बटाटा लागवडीचे सुधारित तंत्र बटाटा हे रब्बीतील महत्त्वाचे पीक आहे. बटाटा...
बियाणे खरेदी करताना दक्षता हवीच..खरीप हंगाम पेरणीवेळी शेतकऱ्यांना सोयाबीन...
बहुपयोगी सूक्ष्म सिंचन प्रणालीरब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक...
कोरडवाहू पिकांसाठी एकात्मिक...पाण्याची उपलब्धता आणि जमीन यांचा योग्य समन्वय...
ओलिताबरोबरच कोरडवाहूसाठी मोहरी पीक...महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील १० ते ३० अंश...
मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम...या आठवड्यात कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात...
नियंत्रण भातावरील लष्करी अळीचे पालघर जिल्ह्यात भात पीक सध्या कापणीला आले आहे....