राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस थांबणार

महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर असून पुढे तो कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून तमिळनाडूकडे जाईल. तमिळनाडूतून डिसेंबर महिन्यात मॉन्सून बाहेर पडेल आणि भारतातील यावर्षीचा मॉन्सून प्रवास समाप्त होईल.
weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale

महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर असून पुढे तो कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून तमिळनाडूकडे जाईल. तमिळनाडूतून डिसेंबर महिन्यात मॉन्सून बाहेर पडेल आणि भारतातील यावर्षीचा मॉन्सून प्रवास समाप्त होईल. मॉन्सून दक्षिण भारतातील काही भागात अद्यापही दोन ते अडीच महिने राहण्याची शक्यता आहे. यापुढील काळात महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्‍यता राहील. महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढले आहेत. कोकण तसेच नाशिक, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पाऊस पूर्णपणे थांबला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाची परतीचा मॉन्सून महाराष्ट्रातून बाहेर पडण्याची सर्वसाधारण तारीख १० ते १२ ऑक्‍टोबर आहे. गुजरातच्या उत्तरेकडील भाग, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या भागातून मॉन्सून परतला आहे. महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर असून पुढे तो कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून तमिळनाडूकडे जाईल. तमिळनाडूतून डिसेंबर महिन्यात मॉन्सून बाहेर पडेल आणि भारतातील यावर्षीचा मॉन्सून प्रवास समाप्त होईल. मॉन्सून दक्षिण भारतातील काही भागात अद्यापही दोन ते अडीच महिने राहण्याची शक्यता आहे. यापुढील काळात महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्‍यता राहील. या आठवड्यात महाराष्ट्रात अल्पशा स्वरूपात ढगाळ हवामान राहील. कमाल तापमानात वाढ होईल. सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल. सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढेल. या आठवड्याच्या अखेरीस उत्तर भारतातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल तर दक्षिण भारतावर १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतील. किमान तापमानात घट होईल. उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहतील आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात तापमानात घट होईल. उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहताच दक्षिण भारतातही थंडीची चाहूल सुरू होईल. महाराष्ट्रातही सकाळी थंड वातावरण जाणवण्यास सुरवात होईल. कोकण  या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ ते १० मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ५ ते १२ मि.मी., रायगड जिल्ह्यात ७ ते १२ मि.मी. व ठाणे जिल्ह्यात १२ ते १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण कोकणात वाऱ्याची दिशा इशान्येकडून तर उत्तर कोकणात आग्नेयेकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणात २३ अंश सेल्सिअस व उत्तर कोकणात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ तर उर्वरित रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील. दक्षिण कोकणात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४२ टक्के तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ५० ते ५५ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात काही दिवशी १० मि.मी. तर धुळे जिल्ह्यात ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील आणि ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, धुळे व नाशिक जिल्ह्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान नंदूरबार जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. मात्र जळगाव जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस, नाशिक व धुळे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३४ टक्के राहील. मराठवाडा  या आठवड्याच्या सुरवातीस औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवशी अल्पशा ५ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. पावसात उघडीप राहील. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यात इशान्येकडून, लातूर व परभणी जिल्ह्यात आग्नेयेकडून तर नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ किमी तर लातूर जिल्ह्यात ताशी ७ किमी राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी राहील. कमाल तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर उर्वरित लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात घट होऊन ते २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळी हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६३ टक्के तर दुपारची ३१ ते ४१ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा बुलडाणा जिल्ह्यात इशान्येकडून, अकोला जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, वाशीम जिल्ह्यात आग्नेयेकडून तसेच अमरावती जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सकाळी हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३४ टक्के राहील. मध्य विदर्भ  या आठवड्यात यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात आग्नेयेकडून तर नागपूर जिल्ह्यात इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५८ टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३४ टक्के राहील. पूर्व विदर्भ  पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ५१ ते ५२ टक्के तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३९ टक्के इतकी कमी राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  या आठवड्यातील काही दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात ५ ते १० मि.मी., सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात ७ ते ८ मि.मी. व नगर जिल्ह्याच्या पूर्व भागात ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा इशान्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर पुणे व सातारा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९३ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यात ७२ ते ७७ टक्के तर उर्वरित सोलापूर, पुणे नगर जिल्ह्यात ६१ ते ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ४९ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • शेतात अद्यापही पाणी साचलेले असल्यास उताराकडील बांधाची एका कोपऱ्याची उंची कमी करून शेतातून पाणी बाहेर काढावे.
  • कोकणात हळव्या जातींची काढणी झाली असल्यास व पाण्याची सोय असल्यास कोकण गौरव या भुईमुगाच्या जातीची पेरणी करावी.
  • हरभरा पिकाची पेरणी करून सारे व पाट पाडावेत. हरभरा पिकांस फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी देण्याची सोय करावी.
  • थंडी सुरू होताच, गव्हाच्या पिकाची पेरणी करावी.
  • जवस व मोहरीची पेरणी करावी.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, तथा सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com