बहुतांश भागात मॉन्सूनोत्तर पाऊसही थांबला

महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मॉन्सूनोत्तर पाऊस थांबलेला आहे. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहून प्रखर सूर्यप्रकाश जाणवेल. तर उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील.
weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale

महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मॉन्सूनोत्तर पाऊस थांबलेला आहे. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहून प्रखर सूर्यप्रकाश जाणवेल. तर उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका वाढलेला आहे. उद्या त्यात १०१२ हेप्टापास्कल इतकी वाढ होऊन तो आठवडाभर कायम राहील. हवेच्या दाबात वाढ झाल्यानंतर पाऊस थांबतो. महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मॉन्सूनोत्तर पाऊस थांबलेला आहे. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहून प्रखर सूर्यप्रकाश जाणवेल. तर उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळच्या आणि दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट झाली आहे. केवळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याच्या कर्नाटक सीमा भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहणार आहे. उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागल्याने कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील हवामान थंड राहण्यास सुरवात झाली आहे. वाऱ्याचा ताशी वेग सामान्य आहे. उत्तर भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे तेथे थंडी सुरू होईल.  सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्याने यापुढील काळात दिवसाचा कालावधी कमी होत जाईल. सूर्याचा कालावधी कमी होत जाऊन हळूवारपणे तापमानात घट होत राहील. यापुढे मॉन्सूनोत्तर पाऊस कर्नाटक, केरळ, पॉंडिचेरी, तमिळनाडू यांसह दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपेक्षित आहे. काही दिवसात दक्षिण कोकण व कर्नाटकातूनही मॉन्सूनोत्तर पावसाची माघार घेईल.  कोकण  दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४ मि.मी. व उद्या ३५ ते ३९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून आणि ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता दक्षिण कोकणात ८० ते ८५ टक्के तर उत्तर कोकणात ६३ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५५ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर नंदूरबार, धुळे व नाशिक जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५९ टक्के तर दुपारची २९ ते ४१ टक्के राहील. मराठवाडा  उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून आणि ताशी वेग ५ ते ८ किमी  राहील. औरंगाबाद, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे या जिल्ह्यांत सूर्यप्रकाश थोडा कमी राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर बीड, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४६ टक्के इतकी कमी राहील. हवामान थंड व कोरडे राहील. पश्‍चिम विदर्भ  या आठवड्यात बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.  वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस इतकी घट होईल. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३७ टक्के राहील. मध्य विदर्भ  या आठवड्यात यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५७ टक्के तर दुपारची ३२ ते ३८ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून आणि ताशी वेग ४ ते ७ किमी राहील. भंडारा जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यात १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३९ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  उद्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३५ ते ३९ मि.मी., सांगली जिल्ह्यात २६ मि.मी., सातारा जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान सातारा, नगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर सोलापूर, पुणे, सांगली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे.  किमान तापमान नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५९ टक्के तर दुपारची सापेक्ष ४४ ते ५९  टक्के राहील.  कृषी सल्ला 

  •  रब्बी बागायती ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्वारी बियाणास २५० ग्रॅम अझॅटोबॅक्टर आणि हरभरा बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम कल्चर प्रति १० किलो बियाणे याप्रमाणात चोळावे. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सुकवून जमिनीस वाफसा येताच पेरणी करावी. 
  •  कोकणात वालाची पेरणी करावी. 
  •  भुईमूग पिकाची काढणी करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com