सौम्य थंडीसह कोरडे हवामान राहील

या आठवड्यातहरियाना, पंजाब, राजस्थान, चंडीगड, दिल्ली या भागांत थंडीची लाट सुरू होईल. त्यामुळेच महाराष्ट्रात सौम्य थंड वारे येतील. महाराष्ट्रातील विविध हवामान विभागांच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण तुलनेने अधिक राहील.
weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale

या आठवड्यात हरियाना, पंजाब, राजस्थान, चंडीगड, दिल्ली या भागांत थंडीची लाट सुरू होईल. त्यामुळेच महाराष्ट्रात सौम्य थंड वारे येतील. महाराष्ट्रातील विविध हवामान विभागांच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण तुलनेने अधिक राहील. महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब आठवडाभर राहील. त्यामुळे या आठवड्यात थंडीचे प्रमाण सौम्य राहील. हरियाना, पंजाब, राजस्थान, चंडीगड, दिल्ली या भागांत थंडीची लाट सुरू होईल. त्यामुळेच महाराष्ट्रात सौम्य थंड वारे येतील. महाराष्ट्रातील विविध हवामान विभागांच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण तुलनेने अधिक राहील. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत, तसेच कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे किमान तापमानात अल्पशी घसरण होईल. उर्वरित महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल. त्यामुळे थंड व कोरडे हवामान राहील.  वाऱ्याचा ताशी वेग साधारण राहील. वाऱ्याची दिशा बहुतांशी भागात ईशान्येकडून राहील. या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता नाही. कमाल तापमानातही घट होईल. त्यामुळे दुपारीही थंडीचे प्रमाण सौम्य प्रमाणात जाणवेल. उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील. कोकणातही थंडीचे प्रमाण अल्पसेच राहील. हवामान बदलाचा प्रभाव या आठवड्यात जाणवणार नाही. सांगली, सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १२ किमी राहील. रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक हवामान राहील. कोकण  कोकणात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. कमाल तापमान ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड व ठाणे जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५६ ते ६५ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३५ ते ४४ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५६ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी इतका कमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर धुळे व नाशिक जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३७ ते ३८ टक्के, तर जळगाव व नाशिक जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. मराठवाडा या आठवड्यात मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद जिल्ह्यात १२ किमी, तर नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यांत ताशी ६ किमी राहील. औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ किमी तर लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी ९ किमी राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. किमान तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस तर लातूर व बीड जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ४८ टक्के, लातूर व बीड जिल्ह्यात ६० टक्के तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ५० ते ५६ टक्के राहील.   दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३८ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भात हवामान अत्यंत कोरडे व थंड राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के राहील. मध्य विदर्भ मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत हवामान कोरडे व थंड राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील.  कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४३ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ५१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३१ टक्के राहील. पूर्व विदर्भ पूर्व विदर्भातील हवामान थंड व अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत २१ ते २२ टक्के राहील व गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत २६ ते ३० टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ११ किमी, कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत ९ किमी, तर सातारा व पुणे जिल्ह्यात ताशी ८ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ६० ते ६३ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७२ ते ७५ टक्के, तर कोल्हापूर जिल्ह्यात ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नगर जिल्ह्यात २४ टक्के, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ४० ते ४१ टक्के, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ५२ ते ५६ टक्के राहील. कृषी सल्ला  

  • कोकणातील चिकू बागांना ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. नारळ झाडांना ड्रीपच्या साह्याने प्रति दिन ३० लिटर पाणी द्यावे.
  • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
  • भात कापणी झाली असल्यास, जमिनीची पूर्ण मशागत करून कुळीथ पिकाची पेरणी करावी.
  • जनावरांना लाळ्या खुरकूतची रोगप्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
  • गहू, हरभरा, मोहरी पिकांच्या पेरण्या कराव्यात.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com