agriculture news in marathi weekly weather by dr. ramchandra sabale | Agrowon

थंडी वाढण्यास अनुकूल हवामान

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होईल. त्यामुळे थंडीचे प्रमाण सध्यापेक्षा अधिक राहील.

या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होईल. त्यामुळे थंडीचे प्रमाण सध्यापेक्षा अधिक राहील. मागील आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल राहतील.

या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे किमान व कमाल तापमानात घसरण होईल. त्यामुळे थंडीचे प्रमाण सध्यापेक्षा अधिक राहील. मागील आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल राहतील. पश्‍चिमेकडील उत्तर भारतात हवेचे दाब वाढत असून, पंजाब, राजस्थान येथे थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचप्रमाणे काश्‍मीर, लडाख भागांतही हवेचे दाब वाढलेले आहेत. त्या ठिकाणी थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन बर्फवृष्टीस सुरुवात झालेली आहे. ईशान्य भारतावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, थंडीचे प्रमाण वाढत आहे. 

या आठवड्यातही महाराष्ट्रातील हवामान ढगाळ राहील. त्याचा परिणाम थंडीवर होण्याची शक्‍यता आहे. मात्र ढगाळ हवामान रब्बी ज्वारीच्या पिकास पोषक राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे थंडीचे प्रमाण हळूवारपणे वाढेल. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान कोरडे राहील. 

रत्नागिरी, बीड, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. उर्वरित जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी राहील. काही भागांत सकाळी धुके व पिकावर दव पडण्यास सुरुवात होईल. दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी भागात पावसाचे प्रमाण अधिक राहील.

कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. उत्तर कोकणातील ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के इतकी कमी राहील. तर दक्षिण कोकणात सकाळच्या आर्द्रतेचे प्रमाण ८३ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५५ टक्के राहील. सध्याची आर्द्रता व तापमान भात कापणी व मळणीसाठी अनुकूल राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर भारत
नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४९ टक्के इतकी कमी राहील. सदर हवामान कापूस वेचणी कामी अनुकूल आहे. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात ४ किमी, तर उर्वरित जिल्ह्यात ९ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील.

मराठवाडा
बीड जिल्ह्यात उद्या ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे या जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण वेगाने वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर परभणी, लातूर व बीड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात या आठवड्यात अजून घट होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील.

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भातील अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ
या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ६२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८३ टक्के तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ४७ ते ४८ टक्के तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७२ ते ७३ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
सर्वच जिल्ह्यांत ३ ते ७ मि.मी. अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. कमाल तापमान नगर, सातारा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, सोलापूर ३३ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर नगर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात ते २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८६ टक्के तर दुपारची  ४० ते ५२ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी एन.आय.ए.डब्ल्यू-३४ या जातींची निवड करावी. हेक्‍टरी १२५ किलो बियाणे पेरावे. सारे पाडून पाट पाडावेत व वाढीच्या अवस्थेनुसार ५ पाणी द्यावे.
  • रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी एन-२-४-१ या जातीची निवड करावी.
  • जनावरांचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य निवाऱ्याची व्यवस्था करावी.

- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)


इतर ताज्या घडामोडी
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...