चक्रीवादळांमुळे ढगाळ हवामान; थंडीवर परिणाम

मंगळवार (ता. ७) ते शुक्रवार (ता. १०) या कालावधीत सकाळी थंडीचे प्रमाण साधारण राहण्याची शक्‍यता आहे. शनिवार (ता. ११) रोजी हवेचा दाब पुन्हा कमी होऊन थंडीमध्ये घट होईल.
weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale

या आठवड्याच्या सुरुवातीस महाराष्ट्रात १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी होताच सध्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ होईल. तसेच ढगाळ हवामान राहण्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होईल. मंगळवार (ता. ७) ते शुक्रवार (ता. १०) या कालावधीत सकाळी थंडीचे प्रमाण साधारण राहण्याची शक्‍यता आहे. शनिवार (ता. ११) रोजी हवेचा दाब पुन्हा कमी होऊन थंडीमध्ये घट होईल. बंगालच्या उपसागरात तिसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रातही चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. एकापाठोपाठ एक निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होताना दिसत आहे. हे वारे प्रामुख्याने आग्नेय दिशेकडून सोबत बाष्प घेऊन येत असल्याने हवामान ढगाळ राहत आहे. वारे उत्तरेकडून वाहतील त्याच वेळी कमाल व किमान तापमानात घसरण होईल. चक्रीवादळांची निर्मिती सलग होत राहणे हा हवामान बदलाचा परिणाम आहे. यामुळे थंडीचा कालावधी कमी होत आहे. सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी राहण्यामुळे थंड व कोरडे हवामान राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होऊन तो १३ ते १४ किलोमीटर राहील. कोकण व पूर्व विदर्भात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे दुपारी उष्ण हवामान राहील. या आठवड्यात किमान तापमानात जास्त घसरण होणार नाही. थंडीचे प्रमाण सामान्यच राहील. कोकण कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६५ टक्के, तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७२ ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३९ ते ४४ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किमी, तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६ ते ७ किमी राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. भात कापणी व मळणीसाठी हवामान अत्यंत अनकूल राहील. उत्तर महाराष्ट्र कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ६० टक्के, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ४० ते ४८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता  २३ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी आणि दिशा आग्नेयकडून राहील. मराठवाडा कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात औरंगाबाद जिल्ह्यात घट होऊन ते १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात आकाश निरभ्र, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत पूर्णतः ढगाळ राहील. लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ८० ते ८२ टक्के, तर बीड, परभणी जिल्ह्यात ७१ ते ७५ टक्के,  हिंगोली व जालना जिल्ह्यांत ६० ते ६४ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के राहील. लातूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के तर उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत ४१ ते ४४ टक्के राहील. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३८ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ६ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, तर वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ५१ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी व दिशा आग्नेयकडून राहील. मध्य विदर्भ यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ किमी व दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  पूर्व विदर्भात कमाल तापमानात वाढ होईल. भंडारा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. किमान तापमानात भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअसपर्यंत घट होईल. त्यामुळे सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामान जाणवेल. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ६३ टक्के, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के  राहील. दुपारची सापेक्ष आर्दता २२ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत काही काळ आकाश पूर्णतः ढगाळ, तर पुणे जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ८३ ते ८४ टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ६८  ते ७९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात १३ ते १४ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत १० ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला 

  • भाताचे गरवे वाण परिपक्व झाले असल्यास, कापणी करून यंत्राद्वारे मळणी करावी.
  • कांदा, द्राक्ष, टोमॅटोवरील रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • भुईमुगाची पेरणी करावी.
  • संत्रा, मोसंबी, पेरू, डाळिंब बागांमध्ये कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com