agriculture news in marathi weekly weather by dr. ramchandra sabale | Agrowon

सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामान

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 17 जानेवारी 2021

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. साधारणपणे मकर संक्रांतीनंतर कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. 
 

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. हवा विरळ होते. साधारणपणे मकर संक्रांतीनंतर कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. मागील २ ते ३ वर्षांच्या तुलनेत या वर्षी थंडीची तीव्रता व प्रमाण कमी आहे.

भारतावर मार्चपर्यंत मध्यम स्वरूपाचा ला निना हवामानविषयक परिणाम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ हवामान, अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावापेक्षा हाच प्रभाव अधिक आहे. या प्रभावामुळे वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहून ढगाळ वातावरण राहत आहे.

कोकण 
कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. दुपारी उष्ण हवामान जाणवेल. सकाळचे किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५४ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६७ ते ८० टक्के इतकी राहील. ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सकाळच्या थंडीची तीव्रता कमी होऊन दुपारी उष्ण हवामान जाणवेल. आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के, तर दुपारची २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

मराठवाडा 
नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे दुपारी उष्ण हवामान जाणवेल. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४६ ते ४९ टक्के, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ५१ ते ५७ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी आणि दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. जालना जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ 
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर उर्वरित बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ 
भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, सांगली, पुणे, सातारा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर, पुणे व सातारा जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ६१ ते ६२ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यांत ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३६ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला 

  • सुरू उसाची लागवड करताना ॲसेटोबॅक्‍टर १० किलो + स्फुरद विरघळवणारे जिवाणू १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. तयार द्रावणात टिपरी १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
  • कलिंगड लागवडीसाठी शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती या जातींची निवड करावी. लागवड सपाट वाफ्यात २ बाय ०.५ मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी २.५ ते ३ किलो बियाणे लागते.
  • हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, अॅग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...