तुरळक ठिकाणी अल्प ते मध्यम पावसाची शक्‍यता

या आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची उघडीप तर काही ठिकाणी अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.
weekly weather by dr ramchandra sabale
weekly weather by dr ramchandra sabale

या आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची उघडीप तर काही ठिकाणी अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे या आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची उघडीप तर काही ठिकाणी अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. गुजरात, राजस्थानच्या पश्‍चिमेस, तसेच वायव्य दिशेस हवेच्या दाबात होणाऱ्या बदलामुळे पूर्व भागात हवेचा दाब कमी होऊन वारे उत्तर-पश्‍चिम भारताकडून पूर्व भारताच्या बाजूस वाहत आहेत. हेच वारे पुन्हा दिशेत बदल होऊन विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे वाहत आहेत. त्यामुळे या भागातील काही ठिकाणी पावसाची शक्‍यता निर्माण होईल. सद्य परिस्थितीत कोकणातही पावसाचे प्रमाण मध्यमच राहील. पूर्व विदर्भ, मराठवाड्यात व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात हवामान ढगाळ राहील. मात्र पावसाचे प्रमाण अल्प ते मध्यम स्वरूपात राहील. पश्‍चिम विदर्भ व मध्य विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसात खंड पडल्याचे दिसून येईल. या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग संपूर्ण राज्यात सर्वसाधारणच राहील. त्यामुळे पावसाला जोर राहणार नाही. ज्या भागात हवेचा दाब कमी होईल, त्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येईल. संपूर्ण पश्‍चिम विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे काही भागात पाऊस होईल. कोकण या आठवड्यात काही दिवशी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात १४ ते ५१ मि.मी. तर उत्तर कोकणातील पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांत ६ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. एकूणच या आठवड्यात पावसाचे प्रमाण व पावसाचा जोर कमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणातील रायगड व ठाणे जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७२ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात काही दिवशी ११ ते ३३ मि.मी. तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात २२ ते ३७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते १४ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर नंदूरबार जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७२ टक्के राहील. मराठवाडा  या आठवड्यात उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण ८ ते १२ मि.मी. तर बीड व औरंगाबाद जिल्ह्यात ४ ते २४ मि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १४ किलोमीटर तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ७ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, लातूर व बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यांत या आठवड्यातील काही दिवशी ३४ ते ६० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशिम जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, बुलडाणा जिल्ह्यात २४ अंश तर अकोला व अमरावती जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ८८ टक्के तर दुपारची ६४ ते ६६ टक्के राहील. आकाश ढगाळ राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात काही दिवशी २० ते ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. या सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत पावसात विविधता राहील. पावसाचे प्रमाण ४ मि.मी. ते २७ मि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के तर दुपारची ५४ ते ६४ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी १३ ते ५१ मि.मी. तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १९ ते ३३ मि.मी. पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ११ किलोमीटर राहील. कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६६ टक्के राहील. कृषीसल्ला

  • आडसाली उसाची लागवड १५ ऑगस्टपर्यंत करावी. लागवडीसाठी १० ते ११ महिने वयाचे बियाणे निवडावे. शक्‍यतो सीओ-८६०३२ जातीची निवड करावी.
  • मका लागवडीसाठी लवकर तयार होणाऱ्या जातींची निवड करावी.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, सुकाणू समिती प्रवृत्त पर्जन्य कृती दल, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com