agriculture news in Marathi, weekly weather forecast | Agrowon

मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल हवामान

डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 22 जून 2019

महाराष्ट्राच्या दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल, उत्तरेस १००२ हेप्टापास्कल व पूर्वेसही तितकाच कमी हवेचा दाब राहिल्यामुळे हवेचे दाब मॉन्सून वाटचाल अत्यंत अनुकूल बनले आहेत. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून काही भागांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही दमदार पावसाची शक्‍यता राहील. ता. २३ रोजी कोकणात अतिवृष्टीची शक्‍यता असून, ता. २४ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर भागात अतिवृष्टीची शक्‍यता राहील. ता. २३ व २४ रोजी मध्य महाराष्ट्रात काही भागांत अतिवृष्टीची शक्‍यता तसेच मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्राच्या दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल, उत्तरेस १००२ हेप्टापास्कल व पूर्वेसही तितकाच कमी हवेचा दाब राहिल्यामुळे हवेचे दाब मॉन्सून वाटचाल अत्यंत अनुकूल बनले आहेत. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून काही भागांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही दमदार पावसाची शक्‍यता राहील. ता. २३ रोजी कोकणात अतिवृष्टीची शक्‍यता असून, ता. २४ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर भागात अतिवृष्टीची शक्‍यता राहील. ता. २३ व २४ रोजी मध्य महाराष्ट्रात काही भागांत अतिवृष्टीची शक्‍यता तसेच मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे. 

कोकण 
रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिनी १६ मिलिमीटर तर ठाणे व रायगड जिल्ह्यात ४ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, या आठवड्यात पावसाचे प्रमाण २३ व २४ जून अधिक राहील.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात अल्पशा पावसाची  शक्‍यता राहील. धुळे, नंदुरबार, जळगाव भागांत येत्या काळात पावसाची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ते ३६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ७१ ते ७६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६८ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के व धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के राहील.

मराठवाडा 
लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व बीड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस आणि हिंगोली जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. लातूर, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता हिंगोली जिल्ह्यात २९ टक्के, परभणी व जालना जिल्ह्यांत ३० टक्के, नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३६ टक्के, तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ४४ ते ४७ टक्के राहील.

दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्र  
कोल्हापूर,सोलापूर,सांगली, सातारा व नगर,पुणे जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस व सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, उर्वरित जिल्ह्यांत २२ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८५ टक्के तर दुपारची ४४ ते ५७ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ६ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ५५ टक्के, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६० ते ६४ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ 
 यवतमाळ,नागपूर व वर्धा जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस व नागपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील व यवतमाळ जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ५२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ६५ टक्के व वर्धा जिल्ह्यात ७७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४० टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
पूर्व विदर्भात काही दिवशी ५ मिलिमीटर प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ३७ अंश, चंद्रपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस तर गोंदिया जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील; तर चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तसेच भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात २४ व २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ६४ ते ६८ टक्के तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ७० ते ८३ टक्के राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३८ टक्के राहील, गडचिरोली जिल्ह्यात ४९ टक्के व चंद्रपूर जिल्ह्यात ६५ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • पावसानंतर ज्या जमिनीत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक ओलावा असेल तेथे प्रथम कडधान्य पिकांची व मध्यम जमिनीवर बाजरी+तूर, सोयाबीन+तूर आंतरपीक पद्धती अवलंबावी. 
  •  पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. पाण्याची सोय असल्यास व पावसात उघडीप होताच एक संरक्षित पाणी द्यावे. 
  •  कमी कालावधीच्या पिकांची निवड व कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड करावी.
     

- डॉ.रामचंद्र साबळे,

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
जेईई, नीट परीक्षा सप्टेंबरपर्यंत स्थगितनवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठीची...
मराठवाड्यातील पाणीटंचाई उस्मानाबाद...उस्मानाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई आता केवळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जून...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५५...
नाशिक : ग्रामपंचायतीला ८० टक्के, झेडपी...येवला, जि. नाशिक : गेली पाच वर्षे १४ व्या वित्त...
सांगलीत घटसर्प, फऱ्याचे मॉन्सूनपूर्व...सांगली  ः कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात गुरूवारी (ता.२)...
एकात्मिक कीड व्यवस्थापनाने लष्करी अळीवर...नाशिक : सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत...
शेतकरी गट, कंपन्यांद्वारे एकत्र या : डॉ...हिंगोली : ‘‘शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया...
नाशिकमधील आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यातनाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा...
परभणी जिल्ह्यातील पाच लघू सिंचन तलाव...परभणी : जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न...
दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करण्याची...पुणे ः ‘कोरोना’च्या संकटात दूध विक्रीत घट झाली...
बाजार समित्या टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना...पुणे ः केंद्र सरकारने पणन सुधारणांच्या दोन...
राज्याच्या ऊर्जा विभागाची १० हजार...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या...
पीककर्ज अडचणींबाबत सहकार निबंधकांशी...सोलापूर  : ‘‘पीक कर्ज मिळण्यासाठी कोणतीही...
नगर जिल्हा बॅंक देणार तीन लाखांपर्यंत...नगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत...
खते दुकानातच नाहीत; मग बांधावर कशी...नगर : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, आघाडी सरकारातील...
जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्‍यांमध्ये...जळगाव ः जिल्ह्यात पावसाचे आगमन वेळेत झाले. पेरणी...
बचतगटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर...मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय...
कृषी विद्यापीठाद्वारे कृषी संजीवनी...अकोला ः राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव...
पुणे जिल्ह्यात ३४३९ हेक्टरवर भात...पुणे ः यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच...