उत्तर भारताच्या दिशेने मॉन्सून वेगाने सरकेल

महाराष्ट्रावर उत्तरेस १००४ तर मध्यावर व दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे सर्वत्र पाऊस सुरू राहील. शुक्रवार (ता.१२) रोजी महाराष्ट्रावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होऊन पावसात वाढ होईल. पूर्व किनाऱ्यावरील, ईशान्य भारतातील हवेचा दाब १००० हेप्टापास्कल व राजस्थान या उत्तर भारतातील ठिकाणी हवेचा दाब ९९८ हेप्टापास्कल इतका कमी होईल. त्यामुळे उत्तर भारताच्या दिशेने मॉन्सून वेगाने सरकेल.
weekly weather
weekly weather

महाराष्ट्रावर उत्तरेस १००४ तर मध्यावर व दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे सर्वत्र पाऊस सुरू राहील. शुक्रवार (ता.१२) रोजी महाराष्ट्रावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होऊन पावसात वाढ होईल. पूर्व किनाऱ्यावरील, ईशान्य भारतातील हवेचा दाब १००० हेप्टापास्कल व राजस्थान या उत्तर भारतातील ठिकाणी हवेचा दाब ९९८ हेप्टापास्कल इतका कमी होईल. त्यामुळे उत्तर भारताच्या दिशेने मॉन्सून वेगाने सरकेल. दक्षिण कोकणात २५ ते ४१ मिमी, उत्तर कोकणात २० ते ३० मिमी, उत्तर महाराष्ट्रात १५ ते १८ मिमी, मराठवाड्यात ६ ते १३ मिमी, पश्‍चिम विदर्भात ६ ते २० मिमी, मध्य विदर्भात १५ ते १८ मिमी, पूर्व विदर्भात ३ ते १० मिमी तर दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रात ७ ते ८ मिमी प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील. उर्वरित महाराष्ट्रात पाऊस वाढेल. कोकण रविवारी व सोमवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत प्रतिदिनी २३ ते ४१ मिमी तर रायगड जिल्ह्यात ३३ ते २६ मिमी तसेच ठाणे जिल्ह्यात १७ ते २० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात रविवार (ता.७) रोजी नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३४ ते ३६ मि.मी. तर सोमवार (ता.८) रोजी १२ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात रविवारी ९ मि.मी. तर सोमवारी १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून व ताशी वेग ८ ते १२ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार जिल्ह्यात ५७ टक्के, नाशिक जिल्ह्यात ६४ टक्के, जळगाव जिल्ह्यात ४४ टक्के राहील.

मराठवाडा रविवार व सोमवार (ता.७ व ८) रोजी उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ३ मिमी, जालना, लातूर व परभणी जिल्ह्यांत ६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत रविवारी १३ ते १९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, हिंगोली जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४८ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात रविवारी (ता.७) रोजी २६ मि.मी. तर सोमवारी (ता.८) ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील तर अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किलोमीटर राहील. वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस तर उर्वरीत बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस तर अकोला व वाशिम जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५० टक्के राहील.

मध्य विदर्भ रविवार (ता.७) रोजी यवतमाळ जिल्ह्यात १७ मि.मी. तर नागपूर जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ७९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ   चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रविवार व सोमवार (ता.७ व ८) रोजी १० मिमी तर भंडारा जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तर गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८१ टक्के तर दुपारची ४१ ते ४८ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत प्रतिदिनी ३ ते ११ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून व ताशी वेग ७ ते १२ किलोमीटर राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, पुणे व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली व नगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील. कृषी सल्ला

  • जमिनीतील ओलावा ६५ मि.मी. म्हणजे वाफसा आल्यावर मूग, मटकी, उडीद, चवळी, सूर्यफूल, सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग व भाजीपाला पिकांची लागवड करावी. जमिनीत चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी.
  • ज्या भागात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस आणि जमिनीत ओलावा झाला नसेल, तेथे पेरण्या करू नयेत.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकानू समिती, महाराष्ट्र राज्य

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com