कोकणात मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्‍यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग यांचे मुंबई आणि नागपूर विभागीय केंद्राद्वारे जिल्हावार हवामान अंदाजाची आकडेवारी पुढील पाच दिवसांसाठी दिली जाते.
weekly weather
weekly weather

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग यांचे मुंबई आणि नागपूर विभागीय केंद्राद्वारे जिल्हावार हवामान अंदाजाची आकडेवारी पुढील पाच दिवसांसाठी दिली जाते. महाराष्ट्रातील सर्व हवामान विभागातील जिल्हावार इन्सॅट उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांचे, हवेच्या दाबाचे, कमाल आणि किमान तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगांनी व्यापले जाणारे आकाश, वाऱ्याचा वेग व वाऱ्याची दिशा यांचे हवामानविषयक आकडेवारीच्या अंदाजांचे विश्‍लेषण या सदरात केले जाते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग यांचे मुंबई आणि नागपूर विभागीय केंद्राद्वारे जिल्हावार हवामान अंदाजाची आकडेवारी पुढील पाच दिवसांसाठी दिली जाते. महाराष्ट्रातील सर्व हवामान विभागातील जिल्हावार इन्सॅट उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांचे, हवेच्या दाबाचे, कमाल आणि किमान तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगांनी व्यापले जाणारे आकाश, वाऱ्याचा वेग व वाऱ्याची दिशा यांचे हवामानविषयक आकडेवारीच्या अंदाजांचे विश्‍लेषण या सदरात केले जाते. हे अंदाज मध्यम पल्ल्याचे असतात. जिल्हावार, विभागवार शेतकरी व नागरिकांनी या विश्‍लेषणाचा व माहितीचा उपयोग करावा. या माहितीचा उपयोग करून शेतीपिकांचे होणारे नुकसान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाऊन उत्पन्नात वाढ व्हावी हाच प्रयत्न व उद्देश आहे. सदर माहिती जिल्हावार असल्याने जिल्ह्यातील विविध भागांतील हवामान स्थिती भिन्न असते. उदा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथे सरासरी ५००० मि.मी. पाऊस होतो तर याच जिल्ह्यातील माण, खटाव, दहिवडी या भागांत ४५० मि.मी. इतका कमी पाऊस होतो. तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम भागात ५००० मि.मी. पाऊस होतो तर पूर्व भागात केवळ ५०० मि.मी. पाऊस होतो. अशा प्रकारे पावसात विविधता असल्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे वाचकांनी त्याचा उपयोग आपापल्या भागातील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात १९७२ मध्ये ८४ तालुके दुष्काळी होते. त्यात आता मोठी वाढ झाली असून, या पट्ट्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये चांगला पाऊस फक्त ९ ते १० दिवसांत होतो. अंदाजाची अचूकता वाढण्यासाठी भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक व मुंबई विभागाचे संचालक यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा करून प्रयत्न सुरू आहेत. वाचकांनी या माहितीचा उपयोग पिकांना पाणी देणे तसेच कीड-रोगांची शक्‍यता अजमावणे, शेतीतील पीक पद्धती बदलण्यासाठी व अधिक उत्पादकता वाढवण्यासाठी करावा. भारत सरकारचा हा उपक्रम असून, प्रत्येक राज्यात तो वापरला जात आहे. कोकण  दक्षिण व उत्तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत रविवार व सोमवार (ता. २१,२२) रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. या दोन्ही दिवशी व त्यापुढे आठवड्यातील काही दिवशी ५८ ते ८६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांंत ३१ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत या आठवड्यात ८ ते १३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. रविवार व सोमवार (ता. २१, २२) रोजी नाशिक जिल्ह्यात प्रतिदिनी ७ ते ८ मिमी, धुळे जिल्ह्यात ११ ते १५ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात रविवार (ता. २१) रोजी १३ मिमी व जळगाव जिल्ह्यात ५ ते ११ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६९ टक्के राहील. मराठवाडा  या आठवड्यात मराठवाड्यात ५ ते १४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार व सोमवार (ता.२१,२२) रोजी ८ व ३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. लातूर जिल्ह्यात ५ मिमी, नांदेड जिल्ह्यात ६ ते १४ मिमी, बीड जिल्ह्यात ६ मिमी, परभणी जिल्ह्यात १० मिमी, हिंगोली जिल्ह्यात ३ ते १० मिमी, जालना जिल्ह्यात ७ मिमी व औरंगाबाद जिल्ह्यात १४ ते ६४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन ७ ते २० किमी प्रतितास इतका राहील. वाऱ्याचा वेग अधिक राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर लातूर, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६८ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भात रविवार व सोमवार (ता. २१, २२) रोजी पावसाची शक्‍यता कमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १० ते ११ किलोमीटर राहील. कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७१ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात ३ ते १० मिमी तर उर्वरित जिल्ह्यात कमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व ताशी वेग १४ ते १६ किलोमीटर राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८३ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर जिल्ह्यात रविवार व सोमवार (ता. २१, २२) रोजी ३ ते ४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. भंडारा जिल्ह्यात ४ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ते ३१ मिमी व गोंदिया जिल्ह्यात १० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व ताशी वेग ८ ते ११ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर गोंदिया जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८१ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात ११ ते १४ मिमी, सांगली जिल्ह्यात ३ ते ६ मिमी, सातारा जिल्ह्यात ४ ते ६ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ३ ते ५ मिमी, पुणे जिल्ह्यात ४ ते १४ मिमी व नगर जिल्ह्यात ६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढून तो १२ ते १८ किमी राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८९ टक्के राहील. कृषीसल्ला

  • वापसा येताच भात, घेवडा, सोयाबीन, मूग, मटकी, उडीद, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल, मका, खरीप ज्वारी, तूर या पिकांच्या पेरण्या कराव्यात.
  • सोयाबीनची पेरणी रूंद वरंबा व सरी पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ होते.
  • पेरणीसाठी दोन चाड्याच्या पाभरीचा उपयोग करावा. एका चाड्यातून बी व दुसऱ्यातून खत पेरावे.
  • - (सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com