राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग, मुंबई व नागपूर या विभागीय केंद्राद्वारे या आठवड्यासाठी मध्य पल्ल्याचे जिल्हावार हवामान अंदाज प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत विस्तृत स्वरूपात ५१ ते १०१ मि.मी. प्रतिदिनी पावसाची शक्‍यता असून, पावसाचा अधिक जोर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत जाणवेल.
weekly weather by ramchandra sabale
weekly weather by ramchandra sabale

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग, मुंबई व नागपूर या विभागीय केंद्राद्वारे या आठवड्यासाठी मध्य पल्ल्याचे जिल्हावार हवामान अंदाज प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत विस्तृत स्वरूपात ५१ ते १०१ मि.मी. प्रतिदिनी पावसाची शक्‍यता असून, पावसाचा अधिक जोर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत जाणवेल. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग, मुंबई व नागपूर या विभागीय केंद्राद्वारे या आठवड्यासाठी मध्य पल्ल्याचे जिल्हावार हवामान अंदाज प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत विस्तृत स्वरूपात ५१ ते १०१ मि.मी. प्रतिदिनी पावसाची शक्‍यता असून, पावसाचा अधिक जोर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत जाणवेल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली व जालना जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता असून, नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४३ ते ४७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १७ ते २२ मि.मी., बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत २६ ते ३७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी राहील व ते ३ ते १० मि.मी. सर्वच जिल्ह्यांत राहील. पश्‍चिम विदर्भातही विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. मध्य विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता राहील. पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांत रविवारी व सोमवारी पावसाची शक्‍यता आहे. कोकण  कोकणात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता असून, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारीही अतिवृष्टीची शक्‍यता आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार, सोमवार जोरदार पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात रविवार, सोमवारी अतिवृष्टीची शक्‍यता आहे, ठाणे जिल्ह्यात रविवारी ७७ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, अतिवृष्टीची शक्‍यता असून, दिवशी सोमवारी ५१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत घसरेल व ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८४ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत रविवारी पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी नंदूरबार जिल्ह्यात आणि नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३६ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमानात घट होऊन ते सर्वच जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९१ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ७६ टक्के राहील. मराठवाडा नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४३ ते ४७ मि.मी. आणि हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५१ ते ५२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत रविवारी पाऊस असेल. कमाल तापमानात घसरण होऊन ते ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तसेच किमान तापमानातही घसरण होऊन ते २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७२ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  पश्‍चिम विदर्भात रविवारी चांगल्या पावसाचा अंदाज असून, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ५२ मि.मी., तर अकोला व अमरावती जिल्ह्यात ३९ ते ४४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी होईल. कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस असेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८५ टक्के, तर दुपारची ४७ ते ५८ टक्के राहील. मध्य विदर्भ यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत रविवारी ३० ते ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी राहील. कमाल तापमानात घट होऊन यवतमाळ जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस असेल. पूर्व विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात ५७ मि.मी., गोंदिया जिल्ह्यात ४३ मि.मी., भंडारा जिल्ह्यात ३९ मि.मी. व चंद्रपूर जिल्ह्यात २५ मि.मी. रविवारी पावसाची शक्‍यता असून, सोमवारी सर्वच जिल्ह्यांत २१ ते २५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमानात घसरण होईल व ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६२ टक्के राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी ५५ मि.मी., तर सोमवारी ७७ मि.मी. म्हणजेच अतिवृष्टीची शक्‍यता राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत रविवारी २७ ते ३३ मि.मी., तर सोमवारी ३९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी ४७ मि.मी., तर सोमवारी ४९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नगर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी २१ ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, सोलापूर जिल्ह्यात ४ ते २२ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान २७ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८८ टक्के व दुपारची ६० ते ७६ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कृषिसल्ला

  • जेथे ६५ मि.मी. जमिनीत ओलावा असेल तेथे वापसा येताच पिकांच्या पेरण्या कराव्यात.
  • पेरणी करताना आंतरपीक पद्धती अवलंबावी.
  • अडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून धस्कटे वेचून लागवडीसाठी जमीन तयार करावी.
  • आडसाली ऊस लागवडीसाठी सी.ओ. ८६०३२ या जातीची निवड करावी.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल, सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com