Agriculture news in marathi weekly weather by ramchandra sabale | Agrowon

कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 12 जुलै 2020

कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे कोकण व कोल्हापूर भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील काही भागात पावसाची उघडीप, काही भागात अल्पसा व इतर भागात मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.

कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे कोकण व कोल्हापूर भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील काही भागात पावसाची उघडीप, काही भागात अल्पसा व इतर भागात मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.

कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे कोकण व कोल्हापूर भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील काही भागात पावसाची उघडीप, काही भागात अल्पसा व इतर भागात मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. कोकणात विस्तृत स्वरूपात प्रतिदिनी ४८ ते ७८ मि.मी. तर कोल्हापूर जिल्ह्यात ५२ ते ६९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ३४ ते ३७ मि.मी. तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात काही दिवशी १७ ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम विदर्भात ३ ते २१ मि.मी. तर मध्य विदर्भात काही दिवशी १६ ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भात ३० ते ४२ मि.मी., चंद्रपूर जिल्ह्यात २१ ते २४ मि.मी., भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १२ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ५२ ते ६९ मि.मी. तर उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १४ ते २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

कोकण
ठाणे जिल्ह्यात रविवारी व सोमवारी (ता.१२,१३) रोजी ४२ ते ४८ मि.मी., रायगड जिल्ह्यात ५१ ते ६३ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ५४ ते ६७ मि.मी. व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७१ ते ७८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १६ मि.मी. राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७७ टक्के राहील. एकूण पावसाचे प्रमाण अधिक राहील.

मराठवाडा
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी व सोमवारी (ता.१२,१३) रोजी १७ ते २२ मि.मी., लातूर जिल्ह्यात १६ ते २२ मि.मी., नांदेड जिल्ह्यात १९ ते २१ मि.मी., बीड जिल्ह्यात २२ मि.मी. तर परभणी जिल्ह्यात ५ ते २२ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात ४ ते ८ मि.मी., जालना जिल्ह्यात ५ ते २१ मि.मी. व औरंगाबाद जिल्ह्यात ८ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन तो १४ ते १८ किलोमीटर राहील. हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, नांदेड, जालना, परभणी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात रविवारी व सोमवारी (ता.१२,१३) रोजी ३४ ते ३७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. धुळे जिल्ह्यात १८ मि.मी., नंदूरबार जिल्ह्यात १७ ते १८ मि.मी. व जळगाव जिल्ह्यात ५ ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन तो १६ ते १८ किलोमीटर राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ६२ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा जिल्ह्यात रविवारी व सोमवारी (ता.१२,१३) रोजी ५ ते २१ मि.मी. पावसाची शक्यता राहील. सोमवार (ता.१३) रोजी अकोला जिल्ह्यात १८ मि.मी., वाशिम जिल्ह्यात ३ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात १९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १९ किलोमीटर इतका अधिक राहील. कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर अकोला व वाशिम जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ६२ टक्के राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात रविवारी (ता.१२) रोजी १२ मि.मी. तर सोमवारी (ता.१३) रोजी १६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नागपूर जिल्ह्यात अनुक्रमे रविवार व सोमवार रोजी ५ व २३ मि.मी पावसाची शक्यता आहे. तर वर्धा जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १३ ते १५ किलोमीटर राहील. नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ७७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४७ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ 
गडचिरोली जिल्ह्यात रविवारी (ता.१२) रोजी ३९ मि.मी. तर सोमवारी (ता.१३) रोजी ४२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी २१ मि.मी. तर सोमवारी २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रविवारी व सोमवारी १२ व १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ६ ते ११ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
रविवारी व सोमवारी (ता.१२,१३) रोजी कोल्हापूर जिल्ह्यात ५२ व ६९ मि.मी. तर उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १४ व २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण प्रमाण राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १२ ते १८ किलोमीटर राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६८ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • सध्या ज्या भागात पेरण्या अद्याप झाल्या नाहीत, तेथे जमिनीत ६५ मि.मी पर्यंत ओलावा असल्याने खरीप पिकांच्या पेरण्या उरकून घेणे आवश्‍यक आहे.
  • ज्या भागात बियाणे उगवणीनंतर दाट पेरा झाला आहे, तेथे विरळणी करावी. ज्याठिकाणी नांगे पडले असतील व बियाणे उगवले नसेल तेथे बियाणे टोकून मातीने झाकावे.
  • पहिली कोळपणी व खुरपणी करून तण नियंत्रण करावे. आंतरमशागतीची कामे पूर्ण करावीत.
  • फळबागांच्या कलमांची लागवड करावी. रोपे सरळ लावावीत.

-(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, सुकाणू समिती प्रवृत्त पर्जन्य कृती दल, महाराष्ट्र)


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...