राज्यामध्ये येत्या काळात चांगल्या पावसाची शक्यता

कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. मध्य व पूर्व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे.
weekly weather
weekly weather

कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. मध्य व पूर्व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात  तुरळक ठिकाणी  अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे काही भागात उघडीप तर हवेचा दाब कमी असलेल्या भागात पावसाची शक्‍यता राहील. मात्र कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. मध्य व पूर्व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी  अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. मान्सून वाऱ्यांना पश्‍चिम व नैर्ऋत्य  दिशेने फारसा जोर नाही. मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत वारे वायव्येकडून वाहून सोबत मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील.  त्यामुळे पश्‍चिम विदर्भासह मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक  राहील.  महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात ताशी वाऱ्याचा वेग सर्वसाधारण वेगापेक्षा कमी राहण्यामुळे मान्सूनच्या पावसाचा जोर अपेक्षित दिसत  नाहीये. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश धरणे अद्याप अर्धीही भरलेली नाहीत. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसाने  बहुतांश धरणे भरतील. मान्सूनच्या पावसाला अद्याप अनुकूल वातावरण प्राप्त झालेले नाही. कोकण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात रविवार (ता.२) रोजी २८ ते ३८ मिमी तर सोमवारी ६४ ते ६९ मिमी पाऊस राहण्यामुळे काही भागात अतिवृष्टीची शक्‍यता राहील. उत्तर कोकणातील रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत रविवार (ता.२) रोजी १४ ते २० मिमी तर सोमवारी ३२ ते ५३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग दक्षिण कोकणात ३ ते ४ किलोमीटर तर उत्तर कोकणात ५ ते ८ किलोमीटर राहील. मान्सून वाऱ्यांना वेग नसल्याने पावसाच्या प्रमाणात फार मोठी वाढ होणार नाही. दक्षिण कोकणात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणात २४ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची आर्द्रता ८७ ते ९० टक्के तर दुपारची आर्द्रता ६६ ते ६७ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक व धुळे जिल्ह्यात ९ ते १२ मिमी तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात २५ ते ३६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा धुळे व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. त्यामुळेच या भागात पावसात विविधता दिसून येते. धुळे व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तर नाशिक व धुळे जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ६१ टक्के राहील. मराठवाडा  उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात ३२ ते ६० मिमी तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात २१ ते ५७ मिमी पावसाची शक्‍यता आहे. जालना जिल्ह्यात काही दिवशी ३१ ते ३६ मिमी तर औरंगाबाद जिल्ह्यात १४ ते १५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील. लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर नांदेड औरंगाबाद जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ६२ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा व अकोला जिल्ह्यात काही दिवशी ४१ ते ४६ मिमी , अमरावती जिल्ह्यात ५३ ते ५५ मिमी तर वाशीम जिल्ह्यात २७ ते ३४ मिमी पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत  वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १४ किलोमीटर राहील. पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५ टक्के राहील. मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात १२ ते ४७ मिमी, नागपूर जिल्ह्यात ६ ते २५ मिमी तर वर्धा जिल्ह्यात काही दिवशी ६ ते १५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ७६ ते ७७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५३ टक्के राहील पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी २२ ते २४ मिमी , गडचिरोली जिल्ह्यात ३२ ते ३९ मिमी तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १५ ते १९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून तर भंडारा जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ किलोमीटर इतका कमी राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. पावसात काही काळ उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस तर भंडारा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५३ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी २५ ते ६८ मिमी, सांगली जिल्ह्यात २० ते २६ मिमी, सातारा जिल्ह्यात २६ ते २८ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ५० ते ५६ मिमी, पुणे जिल्ह्यात ३८ ते ४२ मिमी तर नगर जिल्ह्यात ५१ ते ५३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६६ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • आडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची चांगली मशागत करावी.लागवडीसाठी को-८६०३२ किंवा कोएम-२६५ जातींची निवड करावी. माती परिक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा.
  • दर्जेदार बेणे निवडावे. लागवडीपुर्वी बेणे प्रक्रिया करावी. पट्टा पद्धतीने ऊस लागवड करावी.
  • नवीन लागवड केलेल्या भात खाचरात रोपे स्थिर होईपर्यंत पाण्याची पातळी १ ते २ सें.मी. ठेवावी. जेथे रोपे चांगली रूजली आहेत तेथे बेणणी करावी.
  • नवीन फळबाग लागवडीसाठी जातीवंत योग्य वाढ झालेली कलमे निवडावीत. 
  • भुईमुगाचे पीक ४५ दिवसांचे झाल्यावर त्यावरून मोकळा ड्रम फिरवावा. त्यामुळे आऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होते.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com