Weather Update : कोकणात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता

गणेशोत्सवाच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात बराच काळ उघडीप व काही वेळेस अल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. त्यामुळे काही काळ सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल.
weekly weather by ramchandra sabale
weekly weather by ramchandra sabale

​गणेशोत्सवाच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात बराच काळ उघडीप व काही वेळेस अल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. त्यामुळे काही काळ सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या उत्तरेस १००२, मध्यावर १००४ व दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणात प्रतिदिनी ५० ते ६० मिमी, नाशिक, नंदूरबार व कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट भागात ३५ ते ४५ मिमी तर चंद्रपूर, औरंगाबाद, गडचिरोली व पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट भागात २० ते २५ मिमी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, संपूर्ण मराठवाडा, पश्‍चिम व मध्य विदर्भ, तसेच पश्‍चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत काही दिवशी ७ ते १२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात बराच काळ उघडीप व काही वेळेस अल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. त्यामुळे काही काळ सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होऊन ते ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहील. वाऱ्याचा ताशी वेग सामान्यच राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. आपण १ जून रोजी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्‍यता वर्तवली होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांतच चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे भरली असून, उरलेली धरणे ही यापुढील काळात भरतील. त्यातूनच पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे पाण्याचे प्रश्‍न सुटतील. कोकण  सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात आठवड्याच्या सुरुवातीला प्रतिदिन ५० ते ६० मिमी तर रत्नागिरी जिल्ह्यात ६० ते ७६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते १० किमी राहील. कमाल तापमान रायगड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के राहील. भात पिकास हवामान अनुकूल राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक व नंदूरबार जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट पट्ट्यात प्रतिदिनी १६ ते ५५ मिमी तर धुळे जिल्ह्यात ९ ते २६ मिमी, जळगाव जिल्ह्यात ९ ते १३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १२ ते १५ किलोमीटर राहील. कमाल तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची ८२ ते ८६ टक्के राहील. मराठवाडा  आठवड्याच्या सुरुवातीस औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवशी ३० ते ३२ मिमी, नांदेड जिल्ह्यात १० ते २० मिमी तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ८ ते १० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात ८ किमी, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात १५ ते १६ किमी व उर्वरित नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ताशी ११ ते १३ किमी राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, परभणी व जालना जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८४ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  पश्‍चिम विदर्भात काही दिवशी हलक्‍या स्वरूपात १० ते १३ मिमी पावसाची शक्‍यता असून अधूनमधून उघडीप राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम जिल्ह्यात १६ किमी तर उर्वरित बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ११ ते १३ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उर्वरित अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८५ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी हलक्‍या ते मध्यम स्वरूपात १४ ते १६ मिमी पावसाची शक्यता राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यात काही दिवशी ७ ते १२ मिमी पावसाची शक्‍यता असून काही काळ उघडीप राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ११ ते १३ किमी राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८४ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी मध्यम स्वरूपात २० ते ३० मिमी तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १३ ते १६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८४ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट भागात प्रतिदिनी ४० ते ४३ मिमी तर पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट भागात २० ते २५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. सांगली व सातारा जिल्ह्यात काही दिवशी १० ते १२ मिमी तर सोलापूर व नगर जिल्ह्यात ६ ते ८ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर, सांगली जिल्ह्यात १७ किमी तर उर्वरित जिल्ह्यांत ९ ते ११ किमी राहील. कमाल तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८३ टक्के राहील. कृषीसल्ला 

  • पावसात उघडीप राहताच मूग व उडीद पिकाच्या शेंगा काढणीचे काम करून माल सुरक्षित स्थळी ठेवावा.
  • भात खाचरात ५ सेंमीपर्यंत पाण्याची उंची ठेवावी. भात पिकास फुटवे फुटण्याची अवस्था असल्याने खाचरात पाण्याची योग्य पातळी ठेवावी.
  • खरिपातील पिकांमध्ये खुरपणी, कोळपणी करून तण नियंत्रण करावे.
  • भुईमूग पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल, सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com