कोकणात चांगल्या पावसाची शक्यता

साबळे सल्ला
साबळे सल्ला

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे तसेच केरळवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा दक्षिण भागाकडून तसेच नैॡत्येकडून राहील. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना योग्य दिशा मिळाल्याने आणि हवेचे दाब योग्य असल्यामुळे मॉन्सूनची वाटचाल उत्तर दिशेने होईल. दिनांक १६ जून रोजी स्थिती कायम राहील. दिनांक १७ जून रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील. उत्तरेकडे १००२ तर दक्षिणेकडे १००४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. मॉन्सून वेगाने पुढे सरकेल.  

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ५५ मिलिमीटर, उत्तर कोकणात रायगड व ठाणे जिल्ह्यांत १८ ते २३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ६ ते ८ मिमी तसेच नंदूरबार जिल्ह्यात ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता प्रतिदिनी राहील. मराठवाडा व विदर्भात व पश्‍चिम महाराष्ट्रात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. मात्र, कोल्हापूरला ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग २० किलोमीटरपेक्षा अधिक राहील. 

कोकण   दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५० ते ५५ मिलिमीटर प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. उत्तर कोकणात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २१ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. पाऊस प्रतिदिनी १८ ते २३ मिलिमीटर राहील. 

उत्तर महाराष्ट्र   नाशिक व जळगाव जिल्ह्यांत प्रतिदिनी ६ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर नंदूरबार, धुळे जिल्ह्यांत २ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ते ३९ ते ४१ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत   किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ते २५ ते २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६८ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात ७५ टक्के व नंदूरबार जिल्ह्यात ५५ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ती २५ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. 

मराठवाडा  लातूर, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण प्रतिदिनी १२ मिलिमीटर राहील, तर उर्वरित जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रतिदिनी ७ ते ८ मिलिमीटर, बीड व परभणी जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ मिलिमीटर व हिंगोली जिल्ह्यात प्रतिदिनी ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ते ३७ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्यात ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असते. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ते ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८७ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत ७० ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. 

  पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील तर बुलडाणा जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस व उर्वरित जिल्ह्यांत ते २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३२ टक्के राहील. 

मध्य विदर्भ   मध्य विदर्भात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात नैॡत्येकडून राहील. उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. 

पूर्व विदर्भ  चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ते ४२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात २७ अंश व चंद्रपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ४६ टक्के तर गोंदिया जिल्ह्यात ६१ टक्के राहील. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ ते २८ टक्के राहील. गोंदिया जिल्ह्यात ३५ टक्के व भंडारा जिल्ह्यात २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील. 

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com