agriculture news in Marathi, weekly weather report | Agrowon

कोकणात चांगल्या पावसाची शक्यता
डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 15 जून 2019

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे तसेच केरळवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा दक्षिण भागाकडून तसेच नैॡत्येकडून राहील. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना योग्य दिशा मिळाल्याने आणि हवेचे दाब योग्य असल्यामुळे मॉन्सूनची वाटचाल उत्तर दिशेने होईल. दिनांक १६ जून रोजी स्थिती कायम राहील. दिनांक १७ जून रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील. उत्तरेकडे १००२ तर दक्षिणेकडे १००४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. मॉन्सून वेगाने पुढे सरकेल. 

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे तसेच केरळवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा दक्षिण भागाकडून तसेच नैॡत्येकडून राहील. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना योग्य दिशा मिळाल्याने आणि हवेचे दाब योग्य असल्यामुळे मॉन्सूनची वाटचाल उत्तर दिशेने होईल. दिनांक १६ जून रोजी स्थिती कायम राहील. दिनांक १७ जून रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील. उत्तरेकडे १००२ तर दक्षिणेकडे १००४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. मॉन्सून वेगाने पुढे सरकेल. 

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ५५ मिलिमीटर, उत्तर कोकणात रायगड व ठाणे जिल्ह्यांत १८ ते २३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ६ ते ८ मिमी तसेच नंदूरबार जिल्ह्यात ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता प्रतिदिनी राहील. मराठवाडा व विदर्भात व पश्‍चिम महाराष्ट्रात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. मात्र, कोल्हापूरला ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग २० किलोमीटरपेक्षा अधिक राहील. 

कोकण 
 दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५० ते ५५ मिलिमीटर प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. उत्तर कोकणात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २१ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. पाऊस प्रतिदिनी १८ ते २३ मिलिमीटर राहील. 

उत्तर महाराष्ट्र 
 नाशिक व जळगाव जिल्ह्यांत प्रतिदिनी ६ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर नंदूरबार, धुळे जिल्ह्यांत २ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ते ३९ ते ४१ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत   किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ते २५ ते २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६८ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात ७५ टक्के व नंदूरबार जिल्ह्यात ५५ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ती २५ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. 

मराठवाडा
 लातूर, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण प्रतिदिनी १२ मिलिमीटर राहील, तर उर्वरित जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रतिदिनी ७ ते ८ मिलिमीटर, बीड व परभणी जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ मिलिमीटर व हिंगोली जिल्ह्यात प्रतिदिनी ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ते ३७ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असते. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ते ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८७ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत ७० ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. 

 पश्‍चिम विदर्भ 
बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील तर बुलडाणा जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस व उर्वरित जिल्ह्यांत ते २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३२ टक्के राहील. 

मध्य विदर्भ 
 मध्य विदर्भात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात नैॡत्येकडून राहील. उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. 

पूर्व विदर्भ 
चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ते ४२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात २७ अंश व चंद्रपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ४६ टक्के तर गोंदिया जिल्ह्यात ६१ टक्के राहील. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ ते २८ टक्के राहील. गोंदिया जिल्ह्यात ३५ टक्के व भंडारा जिल्ह्यात २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील. 

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...