मंचरला अॅग्रोवन दिवाळी अंकाचे स्वागत

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ॲग्रोवन दिवाळी अंकाचे स्वागत व सकाळ माध्यम समुहाने महिलांसाठी सुरू केलेल्या “मैत्रीण जीवाभावाची” स्पर्धेचा प्रारंभ आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते झाला.
Welcome to the Manchala Agrowan Diwali issue
Welcome to the Manchala Agrowan Diwali issue

मंचर, जि. पुणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ॲग्रोवन दिवाळी अंकाचे स्वागत व सकाळ माध्यम समुहाने महिलांसाठी सुरू केलेल्या “मैत्रीण जीवाभावाची” स्पर्धेचा प्रारंभ आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते झाला.

यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, सागर थोरात, दत्ता हगवणे, सचिव सचिन बोऱ्हाडे, सकाळ-ॲग्रोवनचे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण)संभाजी घोरपडे, अडते संजय मोरे, राजेंद्र भंडारी, धनेश थोरात, संतोष पोखरकर, सचिन टेमकर व कांदा, बटाटा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा दिशादर्शक ॲग्रोवन “शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, एकरी उत्पादन वाढ, रोगराई, उपाययोजना, राज्यातील विविध शेतीमाल विक्री करणाऱ्या बाजारपेठा व बाजार समित्या मधील शेतीमालाचे बाजारभाव याबाबत परिपूर्ण माहिती ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे.शेतकऱ्यांचा दिशादर्शक म्हणूनच ॲग्रोवनची राज्यात ओळख आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रोवनचे नियमितपणे वाचन करावे. सकाळ मध्यम समूहाने सकाळ व ॲग्रोवन मध्ये सुरू केलेल्या “मैत्रीण तुमच्या जिवाभावाची” स्पर्धेत आपल्या कुटुंबातील महिलांनी सहभाग नोंदवावा.”असे आवाहन देवदत्त निकम यांनी केले.

ॲग्रोवन व सकाळने सुरू केलेल्या “मैत्रीण तुमच्या जिवाभावाची” स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी ॲग्रोवनमधील नावीन्यपूर्ण शेती प्रयोगांची माहिती आत्मसात करावी, असे आवाहन ही घोरपडे यांनी केले. सकाळ-ॲग्रोवनचे वरिष्ठ अधिकारी (वितरण) महेश चौखंडे यांनी योजनेची माहिती दिली. ते म्हणाले की” विजेत्यांना ८ टीव्हीएस स्कुटी पेप प्लस, २५ सोन्याची ठूशी (पाच ग्रॅम), ५०० चांदीचे नाणे (पाच ग्रॅम), एक हजार फ्राय पॅन, २०० पैठणी साडी या आकर्षक बक्षिसांशिवाय  सहभागी प्रत्येक स्पर्धकास हमखास लेडीज हँड बॅग बक्षीस मिळणार आहे”

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com