संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात स्वागत

संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात स्वागत
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात स्वागत

सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात बोते’ आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवार (ता.१६) सकाळी सोलापूर शहरात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत झाले. ‘सोलापुरात सुखसमृद्धी येऊ दे, मुबलक पाऊस पडू दे’ असे साकडे महापौर शोभा बनशेट्टी यांनी संत गजानन महाराजांना घातले. पालखीचे यंदा ५१ वे वर्ष आहे.

महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोलापूरवासीयांच्या वतीने पालखीचे स्वागत केले. पालखीचा दोन दिवस सोलापुरात मुक्काम राहणार आहे. या वेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लक्ष्मी बिरू, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक अविनाश पाटील यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उळे येथून पहाटे सहाच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे पाणी गिरणी चौकात आगमन झाले. भजन गात भगव्या पतका हातामध्ये घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. महापौर बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्त डॉ अविनाश ढाकणे व पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. पाणी गिरणी चौकात पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सोमवारी ‘श्रीं’ची पालखी कुचन प्रशालेत मुक्कामी असेल. मंगळवारी (ता. १७) सकाळी सात वाजता कुचन प्रशालेतून पालखी निघेल. दुपारी ती उपलप मंगल कार्यालयात मुक्कामासाठी येईल. तेथून बुधवारी सकाळी पालखी निघेल. दुपारी देगाव येथे भोजन व त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com