परतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ

The well reached the base of the Patur area
The well reached the base of the Patur area

परतूर, जि. जालना ः निन्म दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात  या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. केवळ १०.५ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. परिसरात होळीनंतर उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. परिसरात विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी समाधनकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे हे धरण कसेबसे मृतसाठ्याच्या वर आले. या धरणाची पाणी साठवणक्षमता ही ३४४.८० दलघमी एवढी आहे. ज्यामध्ये १०२.६०० दलघमी हा मृत पाणीसाठा तर २४२.२०० दलघमी हा जिवंत पाणीसाठा आहे. ज्याची टक्केवारी केवळ १०.५ एवढी आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा मंठा, परतूर, सेलूसह १०० अधिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी लागणार आहे. या धरणातून सिंचनासाठी या वर्षी पाणी मिळणार नाही. त्यामुळे या धरणाखाली येणाऱ्या सिंचनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

निम्न दूधना प्रकल्पावर परतूर, मंठा तालुक्यातील गाव पाणीपुरवठा अवलंबून असून, या वर्षी पाऊस चांगला पडला नसल्याने धरणाचा पाणीसाठा वाढला नाही. त्याचा फटका बहुतांश गावांना बसणार आहे. निम्न दुधनाच्या पाण्यावर शहरात पाणीपुरवठा केला जातो. पण धरणात कमी पाणी असल्याने या उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेची चांगलीच दमछाक होणार हे मात्र नक्की. पाणी नसल्याने रब्बी हंगामात पिके धोक्यात आली आहेत. 

पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठला आहे. अतिवृष्टी अवेळी आलेल्या पावसामुळे या वर्षी विहिरीला चांगले पाणी आले होते. या पावसामुळे जनावराच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटला असला तरी विहिरींची पाणीपातळी झपाट्याने कमी हाऊ लागल्याने पाणीप्रश्‍न गंभीर बनण्याची चिन्ह आहेत. आगामी उन्हाळ्याचे दोन महिने कसे जातील, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com