नगर जिल्ह्यात ९० टक्के विहिरी कोरड्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   : जिल्ह्यातील १५१२ गावांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. बहुतांश भागातील ९० टक्के विहिरी कोरड्या पडल्याने पावसाळ्यापर्यंत कसे नियोजन करायचे हा प्रश्‍न शेतकऱ्यांसह नागरिकांसमोर उभा आहे.

जिल्ह्यातील ९७ महसूल मंडळांपैकी ८१ महसूल मंडळांत गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच भूजलस्तर घटला. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील भूजल पातळीत सातत्याने घट झाली आहे. या वर्षी २४६ गावांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा जास्त खोल गेली. त्यात पारनेर (५७ गावे), कर्जत (४७ गावे) या तालुक्‍यांचा समावेश आहे. भूजल पातळी दोन ते तीन मीटरने घटलेली गावे २८४, तर एक ते दोन मीटरने घटलेली ३३८ गावे आहेत. 

पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी सरकारने ११ हजार ३०३ दशलक्ष घनफूट पाणी यंदा पिण्यासाठी आरक्षित केले. जिल्ह्यात २७६ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यावर ८१९ गावांतील ४१ लाख जनतेची तहान भागते. या पाणी योजनांसाठी चार हजार ५५२ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. पशुधनासाठी एक हजार २६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

तलावांनी गाठला तळ भंडारदरा, मुळासारखे सिंचन प्रकल्प मुख्यतः पश्‍चिम घाटात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने भरतात. मात्र, उर्वरित शिवाराच्या सिंचनासाठी पाझरतलाव, बंधारे, गावतलाव आधार देत असतात. त्याची संख्या ९६४ आहे. मात्र, कमांड क्षेत्रातील काही तलाव वगळता यांपैकी सुमारे ९० टक्के, म्हणजेच सुमारे सव्वानऊशे तलाव कोरडे पडले आहेत.   नऊ हजारांहून अधिक कूपनलिका कोरड्या जिल्ह्यात दोन लाख सहा हजार ८३३ अधिकृत विहिरी आहेत. जिरायती भागातील शेतीचे सिंचन सर्वस्वी विहिरींवर अवलंबून आहे. पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील ९० टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांबाबतही तीच स्थिती आहे. जिल्ह्यातील अधिकृत नऊ हजार ८५० कूपनलिकांपैकी नऊ हजारांहून अधिक कूपनलिकाही कोरड्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com