agriculture news in marathi, wells overflow due to rain, nagar, maharashtra | Agrowon

श्रीगोंदे तालुक्यात पिके गेली; पण विहिरी तुडुंब

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक आणि त्यात नको त्या वेळी कोसळलेल्या पावसामुळे शेतातील पीक घरापर्यंत आलेच नाही. हे दुःख पचवता येणारे नसले, तरी अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या विहिरी याच पावसाने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आगामी रब्बी हंगामाबाबत आशा बाळगून शेतात राबू लागले आहेत. 

श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक आणि त्यात नको त्या वेळी कोसळलेल्या पावसामुळे शेतातील पीक घरापर्यंत आलेच नाही. हे दुःख पचवता येणारे नसले, तरी अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या विहिरी याच पावसाने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आगामी रब्बी हंगामाबाबत आशा बाळगून शेतात राबू लागले आहेत. 

घोड, कुकडी व विसापूर प्रकल्पाचे पाटपाणी आणि भीमा आणि घोड नद्यांच्या पाण्याने श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना आधार दिला. पाणी अडवा पाणी जिरवा ही एकेकाळची संकल्पना काही वर्षांत गरजेची वाटत होती. दुष्काळाने पाठ सोडलीच नाही आणि धरणे भरली असतानाही पाणी मिळालेच नाही, अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली होती. आता आहे त्या पाण्यावर पिके जगवून त्यातून मुलांचे भविष्य पाहणाऱ्या श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याला या वर्षी कोरड्या दुष्काळासोबतच ओला दुष्काळ आहे. सोबतीला कांदा, कापूस, द्राक्षे, डाळिंब या पिकांसह फळबागा आणि चारापिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके अशा पद्धतीने निसर्गानेच हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

श्रीगोंदा कांद्याचे आगर आहे. अनेक गावांतील शेतकरी शेतात राबून कष्टाचे चांगले पैसे कमावतो; पण कांदा पिकाला पावसाने दगा दिला. दुष्काळात कमी पाण्यावर कांद्याचे पीक घेण्यासाठी ठिबकचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना या वेळी जास्त पाऊस झाल्याने शेतातच कांदा व कांद्याची रोपे सोडण्याची नामुष्की आली. डाळिंब व द्राक्षाचा मोठा खर्च करून वाढवलेल्या बागा डोळ्यांदेखत नेस्तनाबूत झाल्या. पांढरे सोने पावसाने मातीमोल केले. मात्र, आता याच कापसाच्या पिकाशेजारची वर्षानुवर्षे कोरडी पडलेली ३२ फूट खोलीची विहीर तुडुंब भरल्याचे समाधान पेडगाव येथील शेतकऱ्यांनी अनुभवले. 

शेतकऱ्यांना पुढील पिकांची आशा 
याच पावसात विहिरी तुडुंब भरल्याने किमान आता पुढची पिके तरी जोमाने येतील, या अपेक्षेने शेतकरी पुन्हा एकदा शेतात राबत आहे. घोड, कुकडीचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने मिळाल्यास श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मातीत गाळलेल्या घामातून पैसा दिसेल, अशी अपेक्षा वाटत आहे.


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...