Agriculture news in marathi Wells reached the bottom in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. मात्र तुलनेत पश्‍चिम भागात पर्जन्यमान अधिक असताना यंदा पाऊस कमी आहे. 

नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. मात्र तुलनेत पश्‍चिम भागात पर्जन्यमान अधिक असताना यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळे या भागात एक मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. तर उत्तरपूर्व भागात चालू वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याची स्थिती असली तरी उपसा वाढल्याने अनेक भागात विहिरींनी तळ गाठला आहे. 

भूजल सर्वेक्षण विभाग यांच्या वतीने माॅन्सून पश्‍चात भूजल पातळीच्या नोंदी ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आल्या. त्यामध्ये दिंडोरी, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात चालू वर्षी घट दिसून आली आहे. तर टंचाईग्रस्त बागलाण, चांदवड, कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, सिन्नर, सुरगाणा व येवला येथे भूजलपातळीमध्ये वाढ दिसून आली आहे. मात्र डिसेंबरनंतर पाणी उपसा वाढला आहे. त्यामुळे हळूहळू विहिरी खोल जाण्यास सुरुवात झाली. तर आता ज्या भागात भूजल पातळी वाढली होती. या भागातही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. 

पूर्व भागात जे पाण्याची टंचाईग्रस्त तालुके होते. या भागात गतवर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे आता उशिरा टंचाई भासत आहे. मात्र याउलट आता काही भागांमध्ये किंवा गटांमध्ये खडकाळ भाग असल्याने स्थानिक भौगोलिक परिस्थिती नुसार पाणीपातळी टिकून राहत नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. 

तालुकानिहाय भूजलपातळी (ऑक्टोबर २०२० अखेर) 
सटाणा ०.४० मीटर वाढ
चांदवड २.६२ मीटर वाढ
देवळा २.१३ मीटर वाढ
दिंडोरी ०.५३ मीटर वाढ
इगतपुरी ०.४९ मीटर वाढ
कळवण ०.४७ मीटर वाढ 
मालेगाव १.४९ मीटर वाढ 
नांदगाव १.९८ मीटर वाढ 
नाशिक ०.५७ मीटर वाढ 
निफाड ०.८८ मीटर वाढ 
पेठ ०.७० मीटर वाढ 
सिन्नर १.५२ मीटर वाढ 
सुरगाणा ०.३६ मीटर वाढ 
त्र्यंबकेश्‍वर ०.७५ मीटर वाढ 
येवला २.३८ मी. वाढ 

समाधानकारक पर्जन्यमान मात्र वापरात वाढ 
पाण्याची टंचाई जाणवत असलेल्या उत्तरपूर्व भागात ज्यामध्ये सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यांत पाऊस समाधानकारक होता. परिणामी रब्बी हंगामात बागायती क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने विहिरींनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे काही भागांत पाण्याअभावी पिकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होत आहे. 

आणि गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे साहजिक पीकपद्धती किंवा जास्त पाणी लागणारे आणि पाणीउपसा वाढून तत्काळ पाणीपातळी खोल जाते. त्यामुळे ही टंचाई परिस्थिती निर्माण होते. आगामी काळात पाणी जपून वापरावे लागणार आहे. पिकासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. तर इतर वापरासाठी अचूक नियोजन करून अपव्यय टाळावा. 
- जीवन बेडवाल, उपसंचालक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा 
 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...