‘कोरोना’ग्रस्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे दोन कोटी रुपये 

कोल्हापूर : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
West Maharashtra Devasthan Committee for 'Corona' sufferers Rs 2 crore
West Maharashtra Devasthan Committee for 'Corona' sufferers Rs 2 crore

कोल्हापूर : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

श्री. जाधव म्हणाले, ‘कोरोना’ विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आपती व्यवस्थापन वा संस्था चांगल्याप्रकारे काम करत आहेत. या जागतिक संकटावर मात करण्यासाठी सर्व स्तरातून मदत केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये १.५० कोटीची मदत जाहीर करीत आहोत. 

त्याचबरोबर आम्ही ५० लाख रुपये जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. त्यातील रुपये २५ लाख रुपये त्यांनी ग्रामीण आरोग्य व नागरी आरोग्य व्यवस्थेकरीता खर्च करावेत व २५ लाख रुपये सी.पी.आर. मधील सुविधांसाठी खर्च करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहोत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com