बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरदऱ्यांना वणव्याची धग

पश्चिम पट्ट्यातील डोंगरदऱ्यांतून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. परिणामी आतापर्यंत शेकडो एकर जंगल जळून खाक झाले आहे.
In the western part of Baglan, the mountains are covered with forest clouds
In the western part of Baglan, the mountains are covered with forest clouds

तळवाडे दिगर, जि. नाशिक : जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगरदऱ्यांतून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. परिणामी आतापर्यंत शेकडो एकर जंगल जळून खाक झाले आहे.

वन पर्यटनासाठी खुणावत असलेल्या बागलाणच्या पश्चिम पाट्यांला निर्सगाच लेणं लाभल आहे. अनेक वर्षापासून येथे वनराई परिसर हिरवाईने नटला आहे. येथे आश्रयाला वन्यप्राणी, पक्षी व दुर्मिळ जीवजंतू  असून जैवसंपदेने हा परिसर संपन्न झाला आहे. औषधी वनस्पतींची मुबलकता दिसत असून या समृद्धतेच वारसा जपणाऱ्या या वनांना आगी लावण्याच्या घटनांना यंदा मोठ्या प्रमाणात घडत असून जवळपास सर्व डोंगर यावर्षी जळून खाक होत आहेत.

उन्हाळा सुरू झाला की परिसरात दर वर्षी वणवे लागण्याच्या समस्या वाढत आहेत. गवत जाळल्याने पावसाळ्यात येणारे गवत चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. ताहाराबाद परिमंडळ क्षेत्रात चालू वर्षी आगीच्या २४ घटना घडल्या असून त्यात शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत पसरते. त्यामुळे वनकर्मचारी, अधिकाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

अनेकदा रात्रीच्या वेळी असा प्रकार केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी होरपळून मरण पावत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने व्यापक स्वरूपात कोटी वृक्षलागवडीची योजना हाती घेतली. अनेक सामाजिक संस्था, गाव, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोठा गाजावाजा करतात. ही योजना राबविण्यात येत असली तरी वणव्याच्या आगीत ही योजना जळून ठिक्कर पडत आहे.

जंगलात वणवे पेर असल्याने वनसंपदेसह वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. भविष्यासाठी वने टिकविणे काळाची गरज आहे. यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेऊन कठोर अंमलबजावणी करावी. - यशवंत धोंडगे, निसर्गप्रेमी, किकवारी खुर्द

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com