इंदापूरच्या पश्‍चिम भागात  लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव 

केंद्र सरकारकडून लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्या अभावी लसीकरण मोहीम रखडली आहे. परिणामी पशुधनाला लाळ्या खुरकूतचा प्रादूर्भाव वाढला आहे.
इंदापूरच्या पश्‍चिम भागात  लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव  In the western part of Indapur Outbreaks of salivary glands
इंदापूरच्या पश्‍चिम भागात  लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव  In the western part of Indapur Outbreaks of salivary glands

वालचंदनगर, जि. पुणे : केंद्र सरकारकडून लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्या अभावी लसीकरण मोहीम रखडली आहे. परिणामी पशुधनाला लाळ्या खुरकूतचा प्रादूर्भाव वाढला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूतमुळे २५ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना शासकीय पशू वैद्यकिय डॉक्टरांकडून वेळेत उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे.  इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय व शेळीपालनाचा व्यवसाय करतात. पश्‍चिम भागामध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लासुर्णे, बोरी, आनंदघन, निंबोडी परिसरातील शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली असल्याने शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. प्रादूर्भाव झालेल्या जनावरांना सुरुवातीला ताप येतो, तोंडामध्ये फोड आल्याने खात येत नाही. पायाच्या नख्याला जखम होते. जनावरांनी खाण्याचे बंद केल्यास जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. त्यामुळे जनावरे दगविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये २५पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेकडून औषधोउपचार मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जनावरांवर खासगी डॉक्टरकडून उपचार केले जात आहे. 

प्रतिक्रिया माझ्याकडे ५० शेळ्या, ५ म्हैसी, १० रेडे, २ गाई आहेत. सर्व जनावरांना लाळ्या खुरकूतची लागण झाली होती. लाळ्या रोगामुळे शेळ्यांची पोटातील पिल्ले मेली आहेत. तसेच माझा भाऊ सतीश यांच्याकडे पाच गाई होत्या. यातील दोन गाईंचा लाळ्या खुरकूत रोगाने मृत्यू झाला आहे. सरकारी पशूवैद्यकीय दवाखान्यामध्ये हेलपाटे मारूनही डॉक्टर येत नसल्यामुळे खासगी डॉक्टराकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधल्यानंतर मला तापाची चार इंजेक्शन मिळाली आहेत. माझ्यासारखीच तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे.  - नानासाहेब गोकुळ साळुंखे, पशुपालक 

प्रतिक्रिया लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लस शुक्रवारपासून (ता.१७) उपलब्ध होणार आहे. १ लाख ५८ हजार लसीचे डोस उपलब्ध होणार असून, तालुक्यातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.  डॉ. रामचंद्र शिंदे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, इंदापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com